जाहिरात

Neeraj Chopra News : अवघ्या 1 सेंटीमीटरने पद हुकलं, भारताचा स्टार नीरज चोप्रा पुन्हा दुसऱ्या स्थानी 

डायमंड लीगमध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्याने सर्वश्रेष्ठ थ्रो केला. मात्र विजेता एंडरसन पीर्टसच्या 87.87 मीटरच्या तुलनेत तो एक सेंटीमीटरने मागे राहिला. 

Neeraj Chopra News : अवघ्या 1 सेंटीमीटरने पद हुकलं, भारताचा स्टार नीरज चोप्रा पुन्हा दुसऱ्या स्थानी 
मुंबई:

भारताचा स्टार भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा यांचं डायमंड लीग (diamond league crown) विजेतेपद अवघ्या एका सेंटीमीटरने हुकलं आहे. त्यामुळं नीरजने या हंगामाच्या अंतिम फेरीत 87.86 मीटर थ्रो करून सलग दुसऱ्यांदा दुसरं स्थान पटकावलं. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता राहिलेल्या 26 वर्षीय नीरज चोप्राने (Neeraj Chopra News) 2022 मध्ये ट्रॉफी जिंकली होती. गेल्या वर्षी तो दुसऱ्या स्थानावर होता. डायमंड लीगमध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्याने सर्वश्रेष्ठ थ्रो केला. मात्र विजेता एंडरसन पीर्टसच्या 87.87 मीटरच्या तुलनेत तो एक सेंटीमीटरने मागे राहिला. 

दोन वेळा विश्वविजेता ठरलेल्या ग्रेनाडाच्या पीटर्सने पहिल्याच प्रयत्नात सर्वोत्तम थ्रो केला होता. जर्मनीच्या ज्युलियन वेबरने 85.97 मीटर फेक करून तिसरं स्थान पटकावलं. टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन चोप्राने गेल्या महिन्यात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलं होते.

टोकियो ऑलिम्पिक खेळात ऐतिहासिक सुवर्ण पदकानंतर पॅरिसमध्ये आपल्या ऑलिम्पिक मॅडलच्या यादीत सिल्वर जोडणारे नीरज दुसऱ्या स्थानावर राहिला, यासाठी त्याला 12,000 अमेरिकन डॉलर मिळाले. तर पीटर्सने आपल्या करिअरमध्ये पहिल्यांदा डायमंड ट्रॉफी जिंकली, त्याला 30 हजार अमेरिकन डॉलरचा कॅश प्राइज देण्यात आला होता. यासह त्याला विश्व एथलेटिक्स चॅम्पियनशीपसाठी वाइल्ड कार्ड एन्ट्रीही मिळाली.   
 

Previous Article
Top-3 Batters: ना सचिन ना लारा! सूर्याने जगातल्या 3 टॉप क्रिकेटरमध्ये कोणाला दिली जागा
Neeraj Chopra News : अवघ्या 1 सेंटीमीटरने पद हुकलं, भारताचा स्टार नीरज चोप्रा पुन्हा दुसऱ्या स्थानी 
aakash-chopra-recalls-indian-coach-fiery-temper-says-when-gambhir-grabbed-truck-driver-collar
Next Article
Gautam Gambhir: 'गौतम गंभीरनं पकडली होती ट्रकवाल्याची कॉलर,' माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक खुलासा