चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुबईमध्ये खेळला जाणार आहे. दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मात्र आजच्या सामन्यनंतर टेबल टॉपर कोण असेल हे ठरणार आहे. अशा परिस्थितीत हा सामना खूप रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.
भारत आणि न्यूझीलंड आतापर्यंत आयसीसी एकदिवसीय स्पर्धांमध्ये 11 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. दोन्ही संघांनी एकमेकांन तडगं आव्हान दिलं आहे. एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही संघ 10 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. यामध्ये पाच वेळा भारताने तर पाच वेळा न्यूझीलंडने बाजी मारली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल बोलायचे तर दोन्ही संघ फक्त एकदाच आमनेसामने आले आहेत. 2000 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत न्यूझीलंड भारताला हरवून पहिल्यांदा चॅम्पियन बनला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दुबईमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांमध्ये कोणत्याही संघाला 250 चा टप्पा गाठता आलेला नाही. बांगलादेशने भारताला 229 धावांचे तर पाकिस्तानने 242 धावांचे लक्ष्य दिले होते. दोन्ही वेळा भारताने सहा विकेट्सनी सहज सामना जिंकला होता. परंतु दुबईची खेळपट्टी संथ आणि फिरकीसाठी उपयुक्त आहे हे या आकडेवारीवरुन समजते.
(नक्की वाचा- IND vs NZ : न्यूझीलंडच्या मॅचमध्ये बदलणार टीम इंडियाचा कॅप्टन? रोहित शर्मानं वाढवलं टेन्शन)
न्यूझीलंडकडे मिचेल सँटनर, मायकेल ब्रेसवेल आणि ग्लेन फिलिप्स असे फिरकीपटू आहेत जे या खेळपट्ट्यांचा चांगला वापर करू शकतात. न्यूझीलंडने काही महिन्यांपूर्वीच भारतीय खेळपट्ट्यांवर भारताला 3-0 ने कसोटी सामन्यात हरवून इतिहास रचला होता. त्यामुळे न्यूझीलंड टीम इंडियाला तगडं आव्हान देऊ शकते.
संभाव्य भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, हर्षित राणा, कुलदीप यादव.
( नक्की वाचा : Champions Trophy : अफगाणिस्तानच्या खेळाडूची इंग्लंडविरुद्ध सेंच्युरी, पण पाकिस्तानची होतीय थट्टा! )
संभाव्य न्यूझीलंड संघ
विल यंग, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), काइल जेमिसन/डॅरिल मिचेल, मॅट हेन्री, विल्यम ओ'रोर्क
दुबईमध्ये हवामान कसे असेल?
आज दुबईमध्ये हवामान स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे. AccuWeather च्या मते, 2 मार्च रोजी पावसाची शक्यता नाही. दिवसाचे तापमान 24 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 21 अंश राहण्याची अपेक्षा आहे.