आयपीएल 2024 रंगात आले असतानाच टी20 वर्ल्ड कपचं काऊंटडाऊन सुरु झालंय. शनिवारपासून पुढच्या चार दिवसांमध्येही कधीही या वर्ल्ड कपमसाठी भारतीय टीमची घोषणा होऊ शकते. गेल्या काही दिवसांमध्ये भारतासह जगभरातील प्रमुख खेळाडूंनी त्यांना वाटणारी भारतीय टीम निवडली आहे. क्रिकेट समालोचक आणि माजी फलंदाज संजय मांजरेकरनंही त्याची टीम निवडलीय. ही टीम वाचून तुम्हाला धक्का नक्की बसेल.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विराटला जागा नाही
विराट कोहलीशिवाय वर्ल्ड कपमधील भारतीय टीमची कल्पना एखादीच व्यक्ती करु शकेल. त्या एखाद्या व्यक्तीमध्ये संजय मांजरेकरचा समावेश आहे. संजय मांजरेकरच्या टीममध्ये विराटला जागा नाही. त्यानं ऋषभ पंत, संजू सॅमसन आणि केएल राहुल या तीन विकेट किपर्सचा समावेश केलाय. वर्ल्ड कप स्पर्धेत सातत्यानं रन्स करणाऱ्या विराटला मांजरेकरनं टीममधून वगळलं आहे.
3 दिग्गज बाहेर
संजय मांजरेकरनं फॅनला धक्का देणं विराटपर्यंतच थांबवलेलं नाही. सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या शिवम दुबेचीही त्यानं निवड केलेली नाही. इतकंच नाही तर गेल्या काही महिन्यात आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्येही सर्वांना प्रभावित केलेल्या रिंकू सिंहकडंही त्यानं दुर्लक्ष केलंय. टीम इंडियाचा प्रमुख ऑल राऊंडर हार्दिक पांड्याचाही त्यानं विचार केलेला नाही. पण, हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्याचा मांजरेकरनं स्वत:च्या टीममध्ये समावेश केलाय.
( नक्की वाचा : यशस्वी जयस्वालला वर्ल्ड कपसाठी गिल नाही तर 'या' खेळाडूचं आव्हान )
संजय मांजरेकरची टीम
1. रोहित शर्मा 2. यशस्वी जयस्वाल, 3. संजू सॅमसन, 4. सूर्यकुमार यादव, 5. ऋषभ पंत, 6. केएल राहुल, 7. रवींद्र जडेजा, 8. युजवेंद्र चहल, 9. कुलदीप यादव, 10. जसप्रीत बुमराह, 11. मोहम्मद सिराज, 12. आवेश खान, 13. हर्षित राणा, 14. मयंक यादव, 15. कृणाल पांड्या