
लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) टीमचे मालक संजीव गोयंका (Sanjiv Goenka) यांनी भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) सोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. गोयंका यापूर्वी रायझिंग पुणे सुपर जायंट्स (Rising Pune Super Giants) या आयपीएल टीमचे देखील कॅप्टन होते. आयपीएल 2016 मधील पॉईंट टेबलमध्ये त्यांची टीम शेवटून दुसऱ्या क्रमांकावर होती. या खराब कामगिरीनंतर गोयंका यांनी धोनीची कर्णधारपदावरुन हकालपट्टी केली होती.
कॅप्टनपदावरुन काढण्याच्या निर्णयाबाबत धोनी आपल्याला एक शब्दही बोलला नाही. धोनी आणि माझं नातं अतिशय चांगलं आहे. कर्णधारपदाचा मुद्दा आमच्या नात्यात कधीही आला नाही, असं गोयंका यांनी स्पष्ट केलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'तो त्याबाबत एक शब्दही बोलला नाही आणि बोलणार ही नाही. हे खासगी नातं आहे. तो दोन व्यक्तींमधील संवाद होता. तो दोघांपुरताच मर्यादीत होता. आमचं नातं आजही खूप चांगलं आहे, हे महत्त्वाचं आहे,' असं गोयंका म्हणाले. रणवीर अलहाबादीया यांच्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते.
43 वर्षांच्या धोनीला अनकॅप प्लेयर म्हणून आगामी आयपीएल सिझनसाठी चेन्नई सुपर किंग्जनं रिटेन केलं आहे. धोनीचा हा शेवटचा आयपीएल सिझन असण्याची शक्यता आहे. पण, या वयातही धोनी स्वत:ची उपयुक्तता दाखवू शकतो, असं गोयंका यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : आधी धोनीला कॅप्टनपदावरुन काढलं आता राहुलवर भडकले! कोण आहेत LSG चे मालक संजीव गोयंका? )
तुम्ही धोनीकडं पाहा. मी त्याच्यासारखा नेता पाहिला नाही. पथीराणा सारख्या तरुण बॉलरला त्यानं मॅच विनर म्हणून तयार केलं आहे. त्याच्या खेळाडूंचा वापर कसा करायचा हे त्याला माहिती आहे. तो त्या पद्धतीनं विचार करतो, असं त्यांनी पुढं सांगिततलं.
गोयकां यांनी या मुलाखतीमध्ये त्यांचा नातू आणि धोनीमधील एक किस्सा देखील सांगितला.
'मी धोनीशी जेव्हा संवाद साधतो त्यावेळी मला त्याच्याकडून काही तरी शिकायला मिळतं. 5-6 वर्षांपूर्वी धोनी माझ्या घरी आला होता. माझा 11 वर्षांच्या नातवाला क्रिकेटचं भयंकर वेड आहे. धोनी माझ्या घरी त्याला कसं क्रिकेट खेळायचं हे शिकवत होता. तो सतत धोनीला प्रश्न विचारत होता. त्याला आता सोड असं मी नातवाला सांगितलं. पण, धोनी म्हणाला असू दे मला त्याच्याशी बोलायला आवडतं.
( नक्की वाचा : धोनीशी 10 वर्षांपासून बोलत नाही, हरभजन सिंगचं धक्कादायक वक्तव्य )
धोनीनं त्याच्यासोबत अर्धा तास घालवला. एका लहान मुलाशी इतकं बोलण्याची त्याच्यात माणुसकी आहे. इतरांशी कसं बोलावं हे तुम्हाला त्याच्याकडून शिकायला मिळतं. त्यामुळेच तो धोनी आहे. तो जेव्हा लखनौविरुद्ध खेळतो तेव्हा संपूर्ण स्टेडियम त्याला पाठिंबा देत असतं, असं गोयंका यावेळी म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world