Shadab Khan : क्रिकेटपटू आणि अभिनेत्री यांच्यातील रिलेशनशिपची नेहमीच चर्चा होत असते. अनेक क्रिकेटपटूंनी आघाडीच्या अभिनेत्रींशी लग्न केलं आहे. तर काही जणांच्या अभिनेत्रीसोबतच्या अफेयर्सच्या चर्चा रंगल्या आहेत. पाकिस्तानमध्ये या सर्व प्रकरणावर वेगळाच वाद सुरु आहे.
पाकिस्तानचा ऑलराऊंडर शादाब खान अभिनेत्रींना टेक्स्ट मेसेज करतो असा दावा पाकिस्तानची टिकटॉकर शाहताज खाननं केला होता. त्याचबरोबर मोमीना इक्बाल आणि नवल सईद यांनी देखील पाकिस्तानचे क्रिकेटपटू व्हॉट्सअपवर मेसेज करतात असा आरोप केला होता. शादाबनं एका कार्यक्रमात बोलताना या सर्व वादावर उत्तर दिलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शादाब खाननं पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सकलेन मुश्ताकच्या मुलीशी लग्न केलं आहे. त्यानंतरही टिकटॉकर शाहताज खाननं शादाबनं आपल्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, असा आरोप केला. त्यानं आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क साधला होता असं शाहताजनं सांगितलं होतं.
TikToker Shahtaj Khan
जियो न्यूजच्या 'हंसना मना है' या कार्यक्रमात बोलताना शादाब खाननं कुणाचंही नाव न घेता या सर्व प्रश्नांवर उत्तर दिलं आहे. कुणाला बोलायचं नसेल तर ती व्यक्ती मनाई करु शकते, असं शादाबनं या कार्यक्रमात सांगितलं.
( नक्की वाचा : Vinod Kambli : विनोद कांबळीला घटस्फोट देणार होती पत्नी, निर्णय बदलण्याचं कारण वाचून वाटेल अभिमान )
शादाब खान यावेळी म्हणाला, 'पाकिस्तानचे क्रिकेटपटू सोशल मीडियावर मेसेज करतात, असा दावा अनेक अभिनेत्रींनी केला आहे. एखाद्या क्रिकेटपटूनं मेसेज केला तर त्यात चूक काय आहे? प्रत्येकाकडं ब्लॉक करण्याचा पर्याय असतो. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही उत्तर देऊ नका. पण, अभिनेत्रींकडूनही उत्तर येतात. त्या देखील बोलण्यास इच्छूक असतात.
शादाबनं यावेळी पुढं सांगितलं की, मी काही व्हिडिओ पाहिले आहेत. त्यामध्ये या गोष्टी रंगवून खमंगपणे सांगितल्या जातात. पण, असं काही होत नाही. काही अभिनेत्री प्रसिद्धीसाठी करतात. विश्वकप सारख्या मोठ्या स्पर्धांच्यावेळी या गोष्टी समोर येतात. कारण, प्रत्येकाचं त्याकडं लक्ष असतं.'