पाकिस्तानच्या क्रीडा विश्वाात एक अविश्वसनीय घटना घडली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) भालाफेकपटू अर्शद नदीमनं (Arshad Nadeem) गोल्ड मेडल जिंकलं. अर्शदनं ब्बल 92.97 मीटर थ्रो करत नवा ऑलिम्पिक रेकॉर्ड केला. ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात वैयक्तिक गोल्ड मेडल जिंकणारा अर्शद पहिला पाकिस्तानी आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बाबरला काय झालं?
ऑलिम्पिकमधील ऐतिहासिक कामगिरीबद्दल अर्शद नदीमचं जगभरातून कौतुक होत आहे. साहजिकच पाकिस्तानातून शुभेच्छांचा त्याच्यावर पाऊस पडतोय. पाकिस्तानमधील सर्व राजकीय नेते, सेलिब्रेटी, खेळाडू त्याचं अभिनंदन करत आहेत. पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन बाबर आझमनं (Babar Azam) देखील अर्शदची अभिनंदन करणारी पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर टाकली.
बाबर आझमला ही पोस्ट करणं चांगलंच महाग पडलं. अनेक युझर्सनी त्याच्यातील चूक दाखवली. तसंच त्याला ट्रोल केलं. पाकिस्तानी देखील यामध्ये मागं नव्हते.
( नक्की वाचा : Arshad Nadeem : पाकिस्तान ते पॅरिस! भाला खरेदीसाठी पैसे नसलेल्या अर्शदनं गोल्ड मेडल कसं जिंकलं? )
बाबरची पोस्ट काय?
बाबर आझमनं या पोस्टमध्ये लिहलं की, '30 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये गोल्ड परत आलं आहे. या मोठ्या उपलब्धीसाठी अर्शद नदीमचं खूप खूप अभिनंदन. संपूर्ण देशाला तुझा अभिमान आहे.
काय चुकलं?
पाकिस्तानला ऑलिम्पकमध्ये शेवटचं गोल्ड मेडल 30 नाही तर 40 वर्षांपूर्वी मिळालं होतं. 1984 साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानच्या हॉकी टीमनं गोल्ड मेडल जिंकलं होतं. तर पाकिस्तानला एखादं ऑलिम्पिक मेडल मिळूनही 32 वर्ष उलटली आहेत.
बाबरनं यावेळी आणखी एक चूक केली. त्यानं या ट्विटमध्ये चुकीच्या अर्शद नदीमला टॅग केलं. त्याच्या या दोन्ही चुकांवरुन तो सोशल मीडियावर ट्रोल होतोय.
पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन त्याच्या संथ बॅटिंगसाठीही क्रिकेट विश्वात ओळखला जातो. 92.97 मीटर थ्रो करणाऱ्या अर्शद नदीमचा संदर्भ घेत नेटिझन्सनी बाबरच्या स्ट्राईक रेटचे देखील वाभाडे काढले.