जाहिरात

Arshad Nadeem : पाकिस्तान ते पॅरिस! भाला खरेदीसाठी पैसे नसलेल्या अर्शदनं गोल्ड मेडल कसं जिंकलं?

Arshad Nadeem Pakistan : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) गोल्ड मेडल जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या अर्शद नदीमनं लोकांकडून वर्गणी गोळा करुन खेळाची सुरुवात केली आहे.

Arshad Nadeem : पाकिस्तान ते पॅरिस! भाला खरेदीसाठी पैसे नसलेल्या अर्शदनं गोल्ड मेडल कसं जिंकलं?
Arshad Nadeem : ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात वैयक्तिक गोल्ड मेडल जिंकणारा अर्शद नदीम हा पहिला पाकिस्तानी आहे.
मुंबई:

Who is Arshad Nadeem ? : दहशतवाद, अशांतता, कर्जाचा डोंगर, अस्थिरता यासारख्या वेगवेगळ्या चुकीच्या कारणांमुळे जगभर चर्चेत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांसाठी 9 ऑगस्ट 2024 हा दिवस ईद इतकाच आनंदाचा आहे. पाकिस्तानच्या निर्मितीला 75 वर्ष उलटली आहेत. पाकिस्तानला ऑलिम्पिकमध्ये पहिलं वैयक्तिक गोल्ड मेडल पटकावण्याची कामगिरी अर्शद नदीम (Arshad Nadeem) या भालाफेकपटूनं केली आहे. पाकिस्तानच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठ्या घटनांमध्ये अर्शदच्या कामगिरीची नोंद झाली आहे.

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा नीरज चोप्रा (Neeraj Chopra) गोल्ड मेडलचा प्रबळ दावेदार होता. नीरजसह सर्वांना मागं टाकत अर्शदनं ही ऐतिहासिक कामगिरी केली. ही कामगिरी करताना त्यानं नवा ऑलिम्पिक रेकॉर्ड केला. 

अर्शदनं भालाफेक स्पर्धेत भाग घेण्यास सुरुवात केली त्यावेळी त्याच्याकडं भाला खरेदीसाठी पैसे नव्हते. संपूर्ण गावातून वर्गणी गोळा करुन तो स्पर्धेत सहभागी होत असे. या प्रतिकूल परिस्थितीमध्ये पाकिस्तान ते पॅरिस असा प्रवास अर्शदनं गोल्ड मेडलच्या घवघवीत यशासह पूर्ण केला आहे.

ऑलिम्पिक रेकॉर्डसह गोल्ड मेडल

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानचे फक्त 7 अ‍ॅथलिट पात्र झाले होते. यापैकी 6 जणांचं आव्हान हे पात्रता फेरीतच संपुष्टात आलं. फक्त अर्शद नदीमनं फायनलमध्ये प्रवेश केला होता. तो पाकिस्तानची पदाकाची सर्वात मोठी आणि शेवटची आशा होता. त्यानं देशवासियांना निराश केलं नाही. 

पहिल्या प्रयत्न फाऊलमुळे वाया गेल्यानंतर अर्शदनं दुसऱ्या प्रयत्नात कमाल केली. त्यानं तब्बल 92.97 मीटर थ्रो करत नवा ऑलिम्पिक रेकॉर्ड केला. यापूर्वीचा रेकॉर्ड नॉर्वेच्या थोरकिल्डसेन एंड्रियासच्या नावावर होता. त्यानं बीजिंगमध्ये 2008 साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये 90.57 मीटर भाला फेकला होता. अर्शदनं 16 वर्षांनी हा रेकॉर्ड मोडला. 


कसा घडला अर्शद नदीम? (Paris Olympics 2024 Gold Medalist Arshad Nadeem Success Story)

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामधील खानावाल हे अर्शदचं गाव. त्याचे वडील मजूर होते. आठ भावंडांमध्ये अर्शद तिसरा. अर्शदच्या घरची परिस्थिती बेताची होती. त्याला शाळेतच खेळाची आवड निर्माण झाली. नेमबाजीपासून सुरुवात केलेला अर्शद भालाफेक या खेळाकडं वळला.नेमबाजीसाठी आवश्यक असलेल्या एकग्रतेचा फायदा त्याला या खेळातही झाला. 

स्पोर्ट्स कोट्यातून सरकारी नोकरी मिळवणे हे अर्शदचे सुरुवातीचे ध्येय होते.पाकिस्तानी भालाफेकटू सय्यद हुसेन बुखारीनं अर्शदला हेरलं. त्याच्या करिअरला नवी दिशा दिली. उत्तम कोच मिळाल्यानंतरही अर्शदचा प्रवास सोपा नव्हता.

ट्रेनिंगसाठी गोळा केली वर्गणी

'अर्शदच्या आजवरच्या प्रवासाची लोकांना कल्पना नाही.सुरुवातीच्या दिवसात त्याला वेगवेगळ्या स्पर्धेत खेळता यावं यासाठी नातेवाईक आणि गावकऱ्यांनी एकत्र येऊन वर्गणी गोळा केली आहे,' अशी माहिती अर्शद नदीमचे वडील मोहम्मद अशरफ यांनी एका मुलाखतीमध्ये दिली होती. 

'माझ्या मुलानं पाकिस्तानसाठी ऑलिम्पिक पदक जिंकलं तर तो आमच्यााठी आणि गावातील प्रत्येकासाठी अभिमानाचा प्रसंग असेल,' असं मोहम्मद अशरफ यांनी ऑलिम्पिकपूर्वी सांगितली होती. अर्शदनं वडिलांसह संपूर्ण पाकिस्तानचं स्वप्न पूर्ण केलं आहे.

( नक्की वाचा : Neeraj Chopra पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रानं पटकावलं सिल्व्हर मेडल! )
 

नदीमचा प्रवास

27 वर्षांच्या अर्शद नदीमनं 2011 साली अ‍ॅथलिटक्समध्ये पदार्पण केलं. तो 2015 साली नॅशनल चॅम्पियन बनला. टोक्योमध्ये 2021 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्रानं गोल्ड मेडल पटकावलं होतं. त्या ऑलिम्पिकमध्ये अर्शद पाचवा आला होता.

अर्शदनं 2022 साली बर्मिंगहॅममध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये 90.18 मीटर लांब विक्रमी थ्रो करत गोल्ड मेडल पटकावलं. 1962 नंतर या स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावणारा तो पहिला पाकिस्तानी अ‍ॅथलिट होता. मागच्या वर्षी झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत अर्शदनं सिल्व्हर मेडल जिंकलं होतं.

( नक्क वाचा : PR Sreejesh: 'या' खास सिमेंटनं बनलीय भारतीय हॉकीची 'द वॉल'! श्रीजेशच्या भक्कम बचावाचं हे होतं रहस्य )
 

क्रिकेटवेड्या पाकिस्ताननं अन्य खेळाकडं क्वचितच लक्ष दिलं आहे. ऐकेकाळी जगात दबदबा असलेली पाकिस्तानची हॉकी देखील सध्या लयाला गेली आहे. सपोर्ट सिस्टम हा प्रकार नसूनही अर्शदनं सर्व अडचणींना त्यानं पॅरिसमध्ये फेकलेल्या भाल्यासारखं दूरवर सोडत गोल्ड मेडल जिंकलंय. इतर सर्व  क्षेत्राप्रमाणेच क्रीडा विश्वातही रसातळाला जात असलेल्या पाकिस्तानला नवा हुरुप देणारी कामगिरी त्यानं केली आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमधील या अविश्वसनीय कामगिरीमुळे पाकिस्तानच्या पुढच्या अनेक पिढ्यांना अर्शद नदीमची रिअल स्टोरी ही एखाद्या दंतकथेसारखी सांगितली जाणार आहे.   

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
Neeraj Chopra : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रानं पटकावलं सिल्व्हर मेडल! पाकिस्तानला गोल्ड
Arshad Nadeem : पाकिस्तान ते पॅरिस! भाला खरेदीसाठी पैसे नसलेल्या अर्शदनं गोल्ड मेडल कसं जिंकलं?
rise-and-fall-of-sushil-kumar-indias-2-time-olympic-medal-winner-wrestler-from-medal-podium-to-tihar-jail
Next Article
देशाला ऑलिम्पिक मेडल मिळवून दिलं पण... तुरुंगात पोहचला! हिरो ते झिरोपर्यंत पूर्ण केला प्रवास