Pakistan Player: लाज काढली! विश्वचषकादरम्यान पाकिस्तानी खेळाडूचे हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन

Pakistan Player Misbehaving with Female Staff: टी-20 विश्वचषकादरम्यान श्रीलंकेतील एका हॉटेलमध्ये पाकिस्तानच्या एका अज्ञात खेळाडूने महिला हाऊसकीपिंग कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केले. टीम मॅनेजरने खेळाडूला दंड ठोठावला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pakistan Cricket Team

आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकातून पाकिस्तानचा संघ बाहेर पडला असला, तरी मैदानाबाहेरील एका वादामुळे पाक खेळाडू पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कँडी येथील एका आलिशान हॉटेलमध्ये मुक्कामादरम्यान, पाकिस्तानच्या एका खेळाडूने हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप 'टेलिकॉम एशिया स्पोर्ट'ने आपल्या अहवालात केला आहे.

नेमकं काय घडलं?

ही घटना श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या सुपर 8 सामन्यापूर्वी घडल्याचा दावा केला जात आहे.  एका पाकिस्तानी खेळाडूने हाऊसकीपिंग स्टाफमधील महिलेशी गैरवर्तन केले. त्या महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केल्यावर हॉटेलमधील इतर कर्मचारी धावून आले आणि त्यांनी या प्रकरणाची तक्रार पाकिस्तान संघाचे मॅनेजर नवीद चीमा यांच्याकडे केली.
 
'गोल्डन क्राऊन हॉटेल'च्या व्यवस्थापनाने यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, मॅनेजर चीमा यांनी खेळाडूच्या वतीने माफी मागितली आणि त्याला तातडीने दंड ठोठावून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला.

(नक्की वाचा-  Iran Israel War: इराणमधील मिनाबच्या फोटोंनी जग हादरले, ट्रम्प यांची पुतणी देखील सुन्न)

पीसीबीकडून कारवाईची शक्यता

पाकिस्तानचा संघ मायदेशी परतल्यानंतर आता या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात आहे. संबंधित खेळाडूला पीसीबीच्या शिस्तभंग समितीसमोर हजर व्हावे लागण्याची शक्यता आहे. टीम मॅनेजरने दंड लावला असला, तरी बोर्ड या खेळाडूवर अतिरिक्त बंदी किंवा मोठी कारवाई करू शकते.

गैरवर्तनाचा जुना इतिहास

पाकिस्तानी खेळाडू आणि कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाचा हा पहिलाच प्रकार नाही. अहवालात यापूर्वीच्या काही घटनांचाही उल्लेख करण्यात आला आहे. गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर असताना मँचेस्टर पोलिसांनी फलंदाज हैदर अलीला बलात्कार प्रकरणाच्या आरोपाखाली अटक केली होती. पुराव्याअभावी त्याची सुटका झाली. 

Advertisement

(नक्की वाचा-  Rohit Sharma VIDEO: रोहितचा पहिल्या दिवशी 'तो' मोलाचा सल्ला अन् संजूने 23 व्या दिवशी मैदान मारलं! पाहा VIDEO)

तर दुसऱ्या एका प्रकरणात पाकिस्तान संघाचे मसाज देणारे मलंग अली यांनीही काही वर्षांपूर्वी मलेशिया दौऱ्यावर महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केले होते, ज्यासाठी त्यांना दंड ठोठावण्यात आला होता. मात्र, या नव्या वादामुळे खेळाडूंच्या शिस्तीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article