Lakshya Sen vs Zii Jia Lee Badminton Men's Singles Bronze Medal : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024) आणखी एका मेडलनं भारताला हुलकावणी दिली आहे. बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत ब्रॉन्झ मेडलसाठी झालेल्या सामन्यात लक्ष्य सेनचा पराभव झाला. लक्ष्यचा मलेशियाच्या ली जी जियानं 21-13, 16-21, 11-21 असा पराभव केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शेवटपर्यंत लढला पण...
22 वर्षांच्या लक्ष्य सेनची ही पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा होती. त्यानं पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये आजवर कोणत्याही भारतीय पुरुष बॅडमिंटनपटूला न जमलेली कामगिरी केली. लक्ष्यनं या स्पर्धेत संस्मरणीय विजय मिळवत सेमी फायनलमध्ये धडक मारली होती. पण, सेमी फायनलमध्ये त्याला पराभूत व्हावं लागलं.
𝐁𝐑𝐄𝐀𝐊𝐈𝐍𝐆: 𝐋𝐚𝐤𝐬𝐡𝐲𝐚 𝐒𝐞𝐧 𝐋𝐎𝐒𝐄𝐒 𝐢𝐧 𝐁𝐫𝐨𝐧𝐳𝐞 𝐦𝐞𝐝𝐚𝐥 𝐦𝐚𝐭𝐜𝐡.
— India_AllSports (@India_AllSports) August 5, 2024
Lakshya lost to WR 7 Lee Zii Jia 21-13, 16-21, 11-21. #Badminton #Paris2024 #Paris2024withIAS pic.twitter.com/z3h9dmJ75j
ब्रॉन्झ मेडलच्या लढतीमध्ये लक्ष्यनं पहिला सेट 21-13 असा जिंकत दमदार सुरुवात केली. पण, ली नं दुसरा सेट 21-16 नं जिंकत कमबॅक केलं. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये लीनं वर्चस्व गाजवलं. त्यानं सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. लक्ष्यनं पिछाडी भरुन काढण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला त्यामध्ये यश मिळालं नाही.
लक्ष्य सेनला यापूर्वी सेमी फायनलमध्ये डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सलेन्सनं 20-22, 14-21 पराभूत केलं होतं. त्यानंतर त्याला मलेशियाच्या ली चा पराभव करुन ब्रॉन्झ मेडल जिंकण्याची संधी होती. पण, दुर्दैवानं त्याला आता चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world