जाहिरात

24 वर्षांच्या भारतीय खेळाडूचा निवृत्तीचा निर्णय, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रचला होता इतिहास

भारतीय महिला टेबल टेनिस टीमनं पॅरिस ऑलिम्पकमध्ये (Paris Olympics 2024) ऐतिहासिक कामगिरी केली होती. या कामगिरीतील स्टार खेळाडूनं 24 व्या वर्षीच निवृत्ती जाहीर केली आहे.

24 वर्षांच्या भारतीय खेळाडूचा निवृत्तीचा निर्णय, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रचला होता इतिहास
मुंबई:


भारतीय महिला टेबल टेनिस टीमनं पॅरिस ऑलिम्पकमध्ये (Paris Olympics 2024) ऐतिहासिक कामगिरी केली होती. भारतीय टीमनं ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच प्री क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्या फेरीत जर्मनीनं भारताचा 3-1 असा पराभव केला. प्री क्वार्टर फायनलमध्ये सामना जिंकण्याचा ऐतिहास विक्रम करणारी 24 वर्षांची खेळाडू अर्चना कामतनं निवृत्तीचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

का घेतला निर्णय ?

भारतीय टेबल टेनिसचं भविष्य समजल्या जाणाऱ्या अर्चनानं टेबल टेनिस सोडण्याचा निर्णय का घेतला याचं कारणही स्पष्ट केलं आहे. अमेरिकेतील लॉस एंजल्समध्ये 2028 साली ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत मेडल पटकावण्याची खात्री नसल्यानं तिनं व्यावसायिक टेबल टेनिसला रामराम करण्याचा निर्णय घेतलाय. टेबल टेनिसमध्ये करिअर केल्यापेक्षा परदेशात जाऊन शिकणार असल्याचं अर्चनानं स्पष्ट केलंय. 

पॅरिस ऑलिम्पिकमधून घरी परतल्यावर अर्चनाना तिचे कोच अंशुल गर्गसोबत पुढील ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकण्याच्या शक्यतेबाबत चर्चा केली. अर्चनाचं प्रामाणिक उत्तर ऐकल्यानंत गर्ग यांनाही धक्का बसला. 

( नक्की वाचा : मेडल हुकलं, पण भाव वाढला! विनेश फोगाटला करारबद्ध करण्यासाठी चढाओढ, इतक्या पटीनं वाढली फीस )
 

'हे खूप अवघड आहे. त्यासाठी खडतर मेहनत करावी लागेल असं मी तिला सांगितलं होतं.  ती जागतिक क्रमवारीत टॉप 100 रँकमध्येही नव्हती. त्यानंतरही गेल्या काही महिन्यात तिनं खेळामध्ये मोठी प्रगती केली होता. पण, माझ्यामते तिनं हा खेळ सोडण्याचा निर्णय मनात घेतला होता. एकदा निर्णय निश्चित झाल्यानंतर मतपरिवर्तन करणे अवघड असते,' असं गर्ग यांनी 'इंडियन एक्स्प्रेस' शी बोलताना सांगितलं.  

'माझा भाऊ नासामध्ये काम करतो. तो माझा आदर्श आहे. त्यानं मला नेहमीच अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिलंय. मी आता माझा अभ्यास पूर्ण करण्याचं ठरवलंय. मला अभ्यास करायला आवडतं, मला त्यामध्ये गती आहे,' अशी प्रतिक्रिया अर्चनानं दिलीय. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
मेडल हुकलं, पण भाव वाढला! विनेश फोगाटला करारबद्ध करण्यासाठी चढाओढ, इतक्या पटीनं वाढली फीस
24 वर्षांच्या भारतीय खेळाडूचा निवृत्तीचा निर्णय, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रचला होता इतिहास
vinesh-phogat-made-serious-allegations-against-delhi-police
Next Article
विनेश फोगाटचे दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप, पोलिसांनीही दिलं उत्तर! प्रकरण काय?