Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरनं (Manu Bhaker) ब्रॉन्झ मेडल जिंकत भारताला दमदार सुरुवात करुन दिली. त्यानंतर भारतीय खेळाडूंची वाटचाल अडखळती झाली आहे. अनेक दिग्गज खेळाडूंना पदक मिळवण्यात अपयश आलं. कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) तर फायनलमध्ये गेल्यानंतर अपात्र ठरल्यानं संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला. आता ऑलिम्पिकमध्ये सर्व देशाचे डोळे 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राकडं (Neeraj Chopra) लागले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नीरजनं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवत इतिहास घडवला होता. नीरजनं पॅरिस ऑलिम्पिकमध्येही दमदार सुरुवात केलीय. त्यानं पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात 89.34 मीटर भालेफेक करत फायनलमध्ये प्रवेश केला. आता गुरुवारी रात्री (8 ऑगस्ट) नीरज या स्पर्धेची फायनल खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
( नक्की वाचा : Neeraj Chopra : आरंभ है प्रचंड! गोल्डन बॉय नीरज चोप्रा ऑलिम्पिक फायनलमध्ये दाखल, पाहा Video )
नीरज चोप्रानं सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक गोल्ड मेडल मिळवावं अशीच प्रार्थना सर्व भारतीय करत आहेत. टीम इंडियाचा विकेटकिपर-बॅटर ऋषभ पंत (Rishabh Pant) देखील यामध्ये मागं नाही. त्यानं ऋषभला पाठिंबा देण्यासाठी एक खास पोस्ट केलीय. त्यामध्ये त्यानं नीरज चोप्रानं गोल्ड मेडल जिंकलं तर एका फॅनला 1 लाख 89 रुपयांचं बक्षीस देणार असल्याचं जाहीर केलंय. तसंच त्यानं 10 लकी फॅन्सना विमानाचं तिकीटही देण्याची घोषणा केलीय.
ऋषभ पंतची पोस्ट
ऋषभ पंतनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केली आहे. त्यामध्ये तो म्हणतो, 'नीरज चोप्रानं उद्या गोल्ड मेडल जिंकलं तर मी सर्वात जास्त लाईक आणि कमेंट करणाऱ्या लकी विजेत्याला 100089 रुपये देईल. अन्य टॉप 10 जणांना विमानाचं तिकीट मिळेल. या, भारत आणि जगभरातून आपल्या भावाला पाठिंबा देऊया'
If Neeraj chopra win a gold medal tomorrow. I will pay 100089 Rupees to lucky winner who likes the tweet and comment most . And for the rest top 10 people trying to get the atttention will get flight tickets . Let's get support from india and outside the world for my brother
— Rishabh Pant (@RishabhPant17) August 7, 2024
नीरजला ऐतिहासिक संधी
नीरज चोप्रा यंदाही गोल्ड मेडल जिंकण्यात यशस्वी ठरला तर सलग दोन ऑलिम्पकमध्ये गोल्ड पटकावणारा तो पाचवा भालाफेकपटू बनेल. यापूर्वी हा विक्रम एरिक लेमिंग (स्वीडन 1908 आणि 1912), जोन्नी माइरा (फिनलँड 1920 आणि 1924), नीरज चोप्राचा आदर्श जान जेलंजी (झेक गणराज्य 1992, 1996) आणि आंद्रियास टी (नार्वे 2004 आणि 2008 ) यांनी सलग दोन ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world