जाहिरात

Pakistan vs UAE: पाकिस्तान क्रिकेटचा ड्रामा, ICC चा एक इशारा, 2 मोठे धोके... म्हणून घातले लोटांगण

Pakistan Cricket Team, Asia Cup 2025 : यूएई (UAE) मध्ये सुरू असलेल्या आशिया कप 2025 मध्ये, बुधवारी जोरदार ड्रामा झाला.

Pakistan vs UAE: पाकिस्तान क्रिकेटचा ड्रामा, ICC चा एक इशारा, 2 मोठे धोके... म्हणून घातले लोटांगण
Pakistan Cricket Team : पाकिस्तान क्रिकेट टीमनं मोठ्या ड्रामानंतर लोटांगण घातलं.
मुंबई:

Pakistan Cricket Team, Asia Cup 2025 : यूएई (UAE) मध्ये सुरू असलेल्या आशिया कप 2025 मध्ये, बुधवारी जोरदार ड्रामा झाला. पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती (Pak vs Uae) यांच्यातील सामना नियोजित वेळेपेक्षा 1 तास उशीरा सुरु झाला. या सामन्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट टीमनं जोरदार गोंधळ घातला. पाकिस्तान टीमनं मॅच रेफरी पॉयक्रॉफ्ट यांना हटवण्यासाठी टोकाचा हट्टीपणा केला. त्यांचा हट्ट इतका वाढला होता की हा सामना होणार नाही, अशी शक्यता काही काळ निर्माण झाला होता. पण आयसीसी (ICC) च्या धमकीने आणि दोन मोठ्या धोक्यांनी पाकिस्तानच्या भूमिकेतील हवा काढून टाकली.

पाकिस्तान टीम हॉटेलमध्ये बाहेर पडलीच नाही

पाकिस्तानी टीम संपूर्ण एशिया कपमधून मॅच रेफरी पॉयक्रॉफ्ट यांना काढून टाकण्याची मागणी करत होती. पण आयसीसीने स्पष्ट केले की, ते कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या अधिकाऱ्याला स्पर्धेतून हटवणार नाहीत. तरीही पाकिस्तानी संघ नियोजित वेळेनुसार हॉटेलमधून बाहेर पडला नाही आणि पीसीबीने (PCB) पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली. पण याच वेळी आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डला थेट इशारा दिला.

( नक्की वाचा : Asia Cup 2025: आशिया कपमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! पाकिस्तानची बहिष्काराची भाषा आणि पुन्हा.... )
 

ICC चा गंभीर इशारा

पाकिस्तान बोर्ड आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने, आयसीसीने पीसीबीला थेट धमकी दिली.  त्यांनी एशिया कपमध्ये खेळण्यास नकार दिला, तर त्यांच्यावर केवळ मोठा आर्थिक दंडच बसणार नाही, तर भविष्यात त्यांना आयसीसीच्या स्पर्धांमध्ये खेळण्यावर बंदीचा सामनाही करावा लागू शकतो. आता पुढील वर्षी भारत आणि श्रीलंका येथे टी20 विश्वचषक आयोजित केला जाणार असल्याने, न खेळण्याच्या परिस्थितीत पाकिस्तान संघाला या मोठ्या स्पर्धेतूनही बाहेर काढले जाऊ शकले असते. ही गोष्ट वेळेत पीसीबीच्या लक्षात आली आणि त्यांनी बहिष्कार टाकण्याचा आपला निर्णय मागे घेतला.

( नक्की वाचा : IND vs PAK: पराभवानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ, शाहिद आफ्रिदीने जावई शाहीनला सर्व जगासमोर झापले ! पाहा Video )
 

आणि घातले लोटांगण...

पाकिस्तानच्या हट्टी भूमिकेमागे सर्वात मोठा धोका होता तो त्यांना होणारे संभाव्य 141 कोटी रुपयांचे नुकसान. पाकिस्तानने एशिया कपवर बहिष्कार टाकला असता, तर त्यांना एशियन क्रिकेट काउंसिल (ACC) च्या वार्षिक कमाईतून मिळणाऱ्या सुमारे 141 कोटी रुपयांना मुकावे लागले असते. एसीएसी आपली वार्षिक कमाई टेस्ट खेळणाऱ्या देशांमध्ये, म्हणजेच भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका यांना 15% रक्कम देते, तर 25% रक्कम असोसिएट्स देश (उदा. हाँगकाँग, ओमान इ.) मध्ये वितरित केली जाते. आधीच आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तान बोर्डसाठी हा एक खूप मोठा धक्का ठरला असता. याच कारणामुळे, आयसीसीचा इशारा आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पाकिस्तानने अखेरीस आत्मसमर्पण करत यूएईविरुद्ध खेळण्याचा निर्णय घेतला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com