जाहिरात
Story ProgressBack

पंतप्रधान मोदींनी घेतली टीम इंडियाची भेट, रोहित-द्रविडसह घेतली ट्रॉफी, Video

PM Modi Meets Indian Team: बार्बाडोसमध्ये फायनल जिंकून वर्ल्ड चॅम्पियन बनलेल्या टीम इंडियानं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

Read Time: 1 min
पंतप्रधान मोदींनी घेतली टीम इंडियाची भेट, रोहित-द्रविडसह घेतली ट्रॉफी, Video
PM Narendra Modi Meets Indian players
नवी दिल्ली:

PM Modi Meets Indian Team: बार्बाडोसमध्ये फायनल जिंकून वर्ल्ड चॅम्पियन बनलेल्या टीम इंडियानं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा, हेड कोच राहुल द्रविडसह भारतीय टीममधील सर्व खेळाडू यावेळी उपस्थित होते. 

पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या या खास भेटीच्या दरम्यान बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह देखील उपस्थित होते. क्रिकेट विश्वात भारताचं नाव उंचावणाऱ्या खेळाडूंसोबत पंतप्रधान मोदींनी खास चर्चा केली. त्यावेळी त्यांनी सर्वांच्या खेळाची प्रशंसा केली. यावेळी कॅप्टन रोहित शर्मा, टीम इंडियाचा मुख्य कोच राहुल द्रविडसह पंतप्रधानांनीही ट्रॉफी उंचावली. 

पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर भारतीय खेळाडू मुंबईसाठी रवाना झाले आहेत. मुंबईमध्ये संध्याकाळी 5 ते 7 दरम्यान ओपन बसमधून टीम इंडियाची विजयी मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 7.30 वाजता भारतीय टीमचा अभिनंदन कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर खेळाडू त्यांच्या हॉटेलकडं मुक्कामाला रवाना होतील. 

( नक्की वाचा : टीम इंडियाची मुंबईत निघणार विजयी मिरवणूक, वाचा संपूर्ण वेळापत्रक )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
Team India Victory Parade Highlights : हा वर्ल्ड कप संपूर्ण देशाचा - रोहित शर्मा
पंतप्रधान मोदींनी घेतली टीम इंडियाची भेट, रोहित-द्रविडसह घेतली ट्रॉफी, Video
Aaditya Thackeray on Team India Victory Parade Open Bus Gujarat Connection
Next Article
भारतीय खेळाडूंच्या कार्यक्रमापूर्वीच राजकारण सुरु, ठाकरेंनी उपस्थित केला गुजरातचा मुद्दा
;