जाहिरात

Rahul Dravid : 'द वॉल' ची प्रांजल कबुली, सचिन तेंडुलकर, गांगुली यांच्याकडून आदर मिळवणं होतं मोठं आव्हान!

Rahul Dravid's Never-Heard-Before Story on Tendulkar and Ganguly:  राहुल द्रविडनं सचिन आणि गांगुलीबद्दल आजवर कधीही न ऐकलेली स्टोरी सांगितली आहे.

Rahul Dravid : 'द वॉल' ची प्रांजल कबुली, सचिन तेंडुलकर, गांगुली यांच्याकडून आदर मिळवणं होतं मोठं आव्हान!
मुंबई:

Rahul Dravid's Never-Heard-Before Story on Tendulkar and Ganguly:  क्रिकेट विश्वातील महान खेळाडूंची यादी राहुल द्रविडशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. 'द वॉल' या टोपणनावावं ओळखल्या जाणाऱ्या द्रविडनं टीम इंडियाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले. द्रविड निवृत्तीनंतर टीम इंडियाचा हेड कोच बनला. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताने 2024 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकला. देशात असा एकही क्रिकेट फॅन नाही ज्याच्या मनात द्रविडबद्दल आदर नाही. आता द्रविडनं एक मोठा खुलासा केलाय. सुरुवातीच्या दिवसांमध्ये सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांच्याकडून प्रशंसा मिळवणे हे माझे उद्दीष्ट होते, असे द्रविडनं कबुल केलं आहे.

काय म्हणाला द्रविड?

द्रविडनं एका पॉडकास्टमध्ये ही आठवण सांगितली आहे. तेंडुलकर, लक्ष्मण, गांगुली आणि भारतीय टीमचा सध्याचा हेड कोच गौतम गंभीर यांच्यासारख्या दिग्गजांसोबत ड्रेसिंग रूम शेअर केल्यामुळे खूप काही शिकायला मिळालं असं द्रविडनं सांगितलं. 

"मला असे वाटत नाही की मी त्यांची नक्कल करत होतो, पण नक्कीच त्यांच्याकडून काही गोष्टी शिकत होतो, फक्त लक्ष्मणकडूनच नाही. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, व्हीव्हीएस (लक्ष्मण) आणि काही काळ गौतम गंभीर यांच्यासोबत ड्रेसिंग रूम आणि मैदानात पार्टरनरशिप केल्यामुळे माझ्या खेळात सुधारणा झाली. तुम्ही या खेळाडूंकडून शिकता, ते कशी तयारी करतात, काही विशिष्ट शॉट्स कसे खेळतात आणि काही गोष्टी कशा प्रकारे करतात हे पाहता आणि त्यांचं अनुकरण करता. 

( Rahul Dravid : सचिन तेंडुलकरचा 'तो' सल्ला ऐकल्याचा पश्चाताप, राहुल द्रविडनं बोलून दाखवली खंत )
 

त्यांच्याकडून तुम्हाला आव्हान दिले जाते आणि पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळते," असे द्रविड यांनी 'हाल चाल और सवाल पॉडकास्ट'च्या एका भागात आशिष कौशिकसोबत बोलताना सांगितले.

मला या सर्व खेळाडूंकडून आदर मिळवायचा होता, पण, त्यांची नक्कल करायची नव्हती, असं द्रविडनं स्पष्ट केलं. 

"तुम्हाला तेंडुलकर, लक्ष्मण आणि गांगुली यांचा आदर मिळवायचा असतो. तुम्हाला त्यांच्याकडून असे ऐकायचे असते की 'ठीक आहे, हा खेळाडू देखील खेळू शकतो. तो माझ्यासोबत या ड्रेसिंग रूममध्ये असण्यास पात्र आहे'. तुम्हाला ते मिळवायचे असते आणि ते कामगिरीतून आणि कृतीतून मिळते. रन्स केल्याने, कठीण परिस्थितीत किंवा परिस्थितीत खेळल्याने ते मिळते. त्यामुळे ते स्वतःच एक प्रेरणा होते. तर तुम्ही या दिग्गाजकडून हे सर्व शिकता. आणि नंतर ते तुमचा खेळ समजून घेतात. 

तुम्ही त्यांच्याशी संवाद साधता. तुम्ही या खेळाडूंसोबत गप्पा मारता. त्यामुळे यात शंका नाही की त्या सर्वांनी मला एक चांगला खेळाडू बनवले, माझी क्षमता गाठण्यास मदत केली. मला आशा आहे की मी त्यांच्यासाठी थोडेफार योगदान दिले असेल,'' असं द्रविडनं स्पष्ट केले. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com