'KKR मध्ये घालवलेला काळ सर्वात खराब', टीम इंडियाच्या स्टारनं सांगितली 'मन की बात'

Kuldeep Yadav : मला केकेआरमध्ये घालवलेल्या कालखंडाचा पश्चाताप वाटतो. मी आज जे काही करतोय ते पूर्वीच करु शकलो असतो, असं कुलदीपनं सांगितलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
कोलकाता नाईट रायडर्स (फोटो : BCCI)
मुंबई:

कुलदीप यादवनं (Kuldeep Yadav) त्याच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय टीममधील जागा नक्की केलीय. सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्येही तो दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) प्रभावी कामगिरी करतो. पण, एक काळ असा होता तेंव्हा कुलदीपचा खेळ त्याच्या लौकिकाला साजेसा होत नव्हता. त्यावेळी त्याला मार्गदर्शनाची गरज होती.  कुलदीपनं मीडियाशी बोलताना त्या काळातील आठवणींना उजाळा दिलाय. 

KKR बाबत काय म्हणाला कुलदीप?

कुलदीप यादव 2016 ते 2020 या काळात कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) सदस्य होता. त्या काळाबद्दल बोलताना कुलदीप म्हणाला की, ' मला केकेआरमध्ये घालवलेल्या कालखंडाचा पश्चाताप वाटतो. मी आज जे काही करतोय ते पूर्वीच करु शकलो असतो. मला त्याचा आजही त्रास होतो. मी त्यावेळी माझ्या स्किलवर काम केलं असतं तर आणखी प्रभावी ठरलो असतो. 

( नक्की वाचा : सचिन @ 51 : सचिन तेंडुलकरच्या 51 अद्भुत गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? )
 

दिल्ली कॅपिटल्समध्ये तशी परिस्थिती नाही. आता मी माझ्या पद्धतीनं परिस्थिती कंट्रोल करतो. माही भाईनं (महेंद्रसिंह धोनी) 2019 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणं सोडलं त्यावेळी मला मार्गदर्शनाची गरज असल्याचं जाणवलं. आता मी अनुभवातून परिपक्व झालो आहे. त्याचा माझ्यावर सकारात्मक प्रभाव पडलाय. 

दिल्ली कॅपिटल्सच्या या बॉलरनं सांगितलं, 'मी यापूर्वी प्रतिस्पर्ध्याचा आदर करत नव्हतो. मला माझ्या स्किलवर विश्वास होता. फलंदाज कसा खेळतोय हे तुम्हाला समजण्याची गरज आहे. मी आता परिपक्व झालोय. मला माझी शक्ती समजलीय. फलंदाजाला कुठं बॉल टाकला पाहिजे, त्याला फटका मारताना कुठं अवघड होईल यावर मी काम करतोय.

Advertisement

( नक्की वाचा : 'मुंबई इंडियन्सकडून खेळलात तर डोकं फुटून जाईल', भारतीय क्रिकेटपटूचा धक्कादायक खुलासा )
 

कुलदीप यादवनं यावेळी दिल्ली कॅपिटल्सचा हेड कोच रिकी पॉन्टिंग तसंच असिस्टंट कोच शेन वॉटसन यांचे आभार मानले आहेत. दिल्ली कॅपिटल्सकडून कुलदीपनं 33 मॅचमध्ये 41 विकेट्स घेतल्या आहेत. भारताच्या लिमिटेड ओव्हर्स टीममध्येही त्यानं स्वत:ची जागा भक्कम केलीय. आगामी टी20 वर्ल्ड कपसाठीही त्याची जागा निश्चित मानली जातीय.