
सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्या मैत्रिचे किस्स जगजाहीर आहेत. रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाच्या अनावरणा वेळी अनेक वर्षांनी तेंडुलकर आणि कांबळी यांना एकाच मंचावर सर्वांनी पाहिलं. त्यावेळी विनोद कांबळीकडे स्वत:हून जावून सचिने विचारपूस केली. विनोद कांबळीची आवस्था पाहून तर अनेकांना धक्का बसला. त्यानंतर सचिन आपल्या जागेवर जावून बसला. या कार्यक्रमानंतर अनेकांनी सचिनचं कौतूक केलं तर अनेकांनी सचिनला ट्रोलही केलं. सर्व काही विसरून विनोद कांबळीची मदत कर असा सल्लाही अनेकांनी दिला.त्यानंतर विनोद कांबळीनं मोठा खुलासा केला आहे. विवेक ललवानी यांना दिलेल्या मुलाखतीत विनोद कांबळी याने सचिनबाबत एका मागोमाग एक मोठे खुलासे केले आहेत.
या मुलाखतीत विनोद कांबळीने आता आपली तब्बेत ठिक असल्याचे सांगितलं. आपल्याल युरीनचा प्रॉब्लेम झाला होता. त्यासाठी तीन तीन रुग्णालयात जावं लागलं. एक महिन्यापासून हा त्रास होत असल्याचंही त्यांनं सांगितलं. हा आजार होण्या आधी घरात असतानाच पडलो होतो. त्यानंतर आपल्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आता आपली तब्बेत सुधारत असल्याचे त्याने स्पष्ट केलं. हे सर्व दारूमुळे झालं नसल्याचंही त्याने सांगितलं. दारू आणि सिगारेट आपण सहा महिन्यापूर्वीच सोडलं असल्याचंही तो या मुलाखतीत म्हणाला आहे.
या मुलाखतीत विनोद कांबळी सचिनबाबत भरभरून बोलला. सचिन बरोबर आपली मैत्री अजूनही कायम आहे. आम्ही दोघे एकमेकांच्या संपर्कात आहोत. आम्ही एकमेकां बरोबर फोन वरून बोलत ही असतो. सचिनने तुला मदत केली नाही असं बोललं जात असा प्रश्नही विनोद कांबळीला विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना त्याने हे पुर्ण पणे नाकारले. सचिनने आतापर्यंत मला खुप मदत केली आहे. त्याने माझ्यासाठी खूप गोष्टी केल्या आहे. माझी दोन ऑपरेशन लिलावतीमध्ये झाली. त्याचा सर्व खर्च सचिननेच केला होता. त्यावेळी सचिनने माझी काळजी घेतली. पडद्या काळात मदत केली असंही विनोद यावेळी म्हणाले.
2009 साली सचिनने आपल्याला मदत केली नाही. त्याने मदत केली असती तर आपण भारतीय संघात असतो असे वक्तव्य विनोद कांबळी याने केले होते. त्यानंतर एक वाद निर्माण झाला होता. शिवाय सचिन आणि विनोद कांबळ यांच्यात दुरावाही निर्माण झाला होता. मात्र ते वक्तव्य आपण चुकून केले होते. संघात स्थान मिळत नसल्यामुळे त्रासून तसं बोललो होतो. आपले इमोशन बाहेर आले होते. आमची मैत्री लहान पणापासूनची होती. त्यामुळे झालं गेलं सर्व विसरून मी त्याच्याशी बोलायला लागलो. सचिन ही माझ्याशी बोलू लागला. आमची मैत्री आणखी घट्ट झाली असंही विनोद या मुलाखतीत म्हटला.
सध्याच्या आर्थिक स्थितीबाबतही विनोदनं सांगितलं. सध्या आपली आर्थिक स्थिती अतिशय वाईट आहे असं विनोदने सांगितलं. सर्व काही पत्नी सांभाळत आहे. काही मित्र येवून भेटून जात आहेत. कपिल देव आणि सुनिल गावस्कर यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. पण त्यांनी पुनर्वसन केंद्रात जाण्याची अट टाकली आहे. यावर विनोद कांबळी याने आपण पुनर्वसन केंद्रात जाण्यास तयार असल्याचं सांगितलं. शिवाय आपल्याला बीसीसीआय कडून मदत मिळाली यासाठी काही जण प्रयत्न करत असल्याचंही त्याने सांगितलं. भारताकडून खेळलो आहे त्यामुळे आपल्याला बीसीसीआय मदत करेल असा विश्वासही व्यक्त केला.
आपण लवकरच बरे होवू. त्यानंतर पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची इच्छा विनोद कांबळी याने व्यक्त केली आहे. दरम्यान आचरेकर सरांसमोर केलेले द्विशत आपल्यासाठी खास आहे ही आठवणही त्याने सांगितली. शिवाय आचरेकर सरांच्या स्मृती स्मारकाच्या कार्यक्रमात त्यांच्या आवडीचे गाणे मी बोलून दाखवले. हे गाणे त्यांना आवडते हे मलाच माहित होते. ते सचिनलाही माहित नव्हते असं विनोद कांबळी याने यावेळी आवर्जून सांगितलं. शेन वॉर्न बरोबरची आठवणही त्याने सांगितली. त्याला एकाच ओव्हरमध्ये 22 धावा चोपल्या होत्या. त्याआधी त्याने आपल्याला शीवी दिली होती. त्याला मी माझ्या बॅटने उत्तर दिलं होतं असंही यावेळी विनोदने या मुलाखतीत सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world