जाहिरात

भारतीय क्रिकेटच्या 'गब्बर'ची निवृत्तीची घोषणा

डावखुरा सलामी फलंदाज शिखर धवन याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले.

भारतीय क्रिकेटच्या 'गब्बर'ची निवृत्तीची घोषणा
नवी दिल्ली:

भारतीय क्रिकेट संघाचा डावखुरा सलामी फलंदाज शिखर धवन याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. गेल्या काही वर्षापासून शिखर धवन हा भारतीय संघाच्या बाहेर फेकला गेला होता. संघात स्थान मिळवणे अवघड झाले होते. त्यामुळे शेवटी त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शिखर धवन हा सध्या 38 वर्षाचा आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हीडिओतून त्यांना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिवाय भावनिक होत देशवासींना आणि आपल्या चाहत्यांबरोबर संवाद साधला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - मविआचा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर, हायकोर्टाचा निर्णय

त्या व्हीडिओत सुरूवातीला तो म्हणतो, सर्वांना माझा नमस्कार. आज अशा ठिकाणी आहे जिथून मागे पाहीले तर फक्त आणि फक्त आठवणीच दिसतात. पुढे पाहीले तर संपुर्ण जग दिसत आहे. आयुष्यात एकच गोष्टी नजरे समोर ठेवली होती ती म्हणजे  भारतासाठी क्रिकेट खेळणे. ते मी करून ही दाखवलं. यासाठी मी अनेक लोकांचा आभारी आहे. त्यात सर्वात आधी माझे कुटुंब आहे असे शिखर म्हणतो. शिवाय त्यांनी आपले लहानपणीचे कोच तारक सिन्हा आणि मदन शर्मा यांचेही आभार मानले आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
रिझवानची डबल सेंच्युरी रोखण्यासाठी कॅप्टननं केला कट? पाकिस्तानच्या खेळाडूचा मोठा दावा...
भारतीय क्रिकेटच्या 'गब्बर'ची निवृत्तीची घोषणा
shikhar-dhawan-5-big-records-dhawan-retires-from-international-and-domestic-cricket
Next Article
शिखर धवनचे 'जगात भारी' 5 रेकॉर्ड्स, तिसरा रेकॉर्ड वाचून तुम्हाला वाटेल आश्चर्य