Manu Bhaker : पिस्तुलाने दिलेला धोका ते कांस्य पदक... मनू भाकरची दोन ऑलिम्पिकमधील कहाणी

Manu Bhaker : टोकियो ऑलिम्पिक ते या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यापर्यंतचा तिचा प्रवास सोपा नव्हता. दरम्यानच्या काळात ती नैराश्यातून गेली. यावरही तिने मात करत कठोर परिश्रम घेत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

भारताची 22 वर्षीय नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इतिहास रचला आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती महिला नेमबाज ठरली आहे. मनूने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत तिसरे स्थान पटकावले आणि कांस्यपदक जिंकले. मनू भाकरने अंतिम फेरीत 221.7 गुण मिळवले. दक्षिण कोरियाच्या ओ ये जिनने सुवर्ण पदक तर किम येजीने रौप्य पदक पटकावले. 

टोकियो ऑलिम्पिक ते या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यापर्यंतचा तिचा प्रवास सोपा नव्हता. दरम्यानच्या काळात ती नैराश्यातून गेली. यावरही तिने मात करत कठोर परिश्रम घेत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.

मनूला टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरी गाठता आली नव्हती. पात्रता फेरीदरम्यान तिच्या पिस्तुलमध्ये बिघाड झाला होता. शेवटच्या क्षणी तिच्या पिस्तुलात बिघाड झाल्याने तिला पात्रता फेरीत बाहेर पडावं लागलं. दरम्यान तिला पाच मिनिटे थांबावं लागलं होतं. 

Advertisement

(नक्की वाचा - पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं पहिलं पदक, मनू भाकरची ऐतिहासिक कामगिरी)

मनूने पात्रता फेरीत 98 गुण मिळवले होते. दुसऱ्या फेरीत त्याचे पिस्तूल खराब झाले. यानंतर ती टार्गेट सोडून बाहेर आली आणि सुमारे पाच मिनिटांनी तिची पिस्तुल फिक्स झाली. त्यानंतर अंतिम फेरी गाठण्यापासून ती दोन गुणांनी दूर राहिली. यानंतर मनूला अश्रू अनावर झाले होते. त्यानंतर ती काही काळ नैराश्यात गेली होती. मात्र स्वत:ला न थांबवना तिने पुन्हा नव्याने सुरुवात केली.

Advertisement

(नक्की वाचा - कोण आहे मनू भाकेर?)

टोकियो ऑलिम्पिकनंतरची मनू भाकेरची कामगिरी

टोकियो ऑलिम्पिकनंतर लवकरच मनू भाकर लिमा येथे महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन बनली. त्यानंतर तिने ज्युनियर सर्किटमध्ये नियमितपणे पदके जिंकली. मनू भाकेरने 2022 कॅरो वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 25 मीटर पिस्तूलमध्ये रौप्यपदक जिंकले आणि 2023 च्या हांगझोऊ येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर मनूने चँगवॉन येथे आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2023 मध्ये महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात पाचवे स्थान मिळवून भारतासाठी पॅरिस 2024 ऑलिम्पिक कोटा मिळवला आहे.