जाहिरात

Breaking : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं पहिलं पदक, मनू भाकरची ऐतिहासिक कामगिरी

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील (Paris Olympics 2024) महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारतातून मनू भाकरने आज अंतिम सामन्यात मोठी कामगिरी केली आहे.

Breaking : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं पहिलं पदक, मनू भाकरची ऐतिहासिक कामगिरी
नवी दिल्ली:

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील (Paris Olympics 2024) महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारतातून मनू भाकरने आज अंतिम सामन्यात मोठी कामगिरी केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आज पहिलं पदक मिळालं असून मनू भाकरनं नेमबाजीत 221.7 पॉईंट्स मिळवत ब्राँझ पद मिळवलं आहे. 

मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्टलच्या अंतिम स्पर्धेत जबदरस्त कामगिरी करीत भारतातील ब्राँझ पदक मिळवण्यात यशस्वी राहिली आहेत. मनू भाकर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली महिला ठरली आहे. याशिवाय पहिल्या क्रमांकावर कोरियाची नेमबाज ओ ये जीन 243.2 पॉइंट्स आणि द्वितीय क्रमांकावर कोरियाच्या किम येजी 241.3 पॉइंट्स मिळवले आहे. 

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनूने भारताला पहिलं पदक मिळवून दिलं आहे. 2020 मध्ये टोकिया ऑलिम्पिकदरम्यान पिस्टलमध्ये बिघाड झाल्यामुळे तिला मोठा धक्का बसला होता. यादरम्यान ती भावुक झाली होती. मात्र या दु:खातून बाहेर पडत तिने आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं खातं उघडलं आहे. 

नक्की वाचा - Who Is Manu Bhaker : कोण आहे मनू भाकेर?

कोण आहे मनू भाकर?
नेमबाज मनू भाकरने पिस्टल शूटिंगमध्ये असाधारण कौशल्याने आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आपलं नाव केलं आहे. हरियाणाच्या झज्जरमध्ये राहणाऱ्या मनू भाकरचा जन्म 18 फेब्रुवारी 2002 मध्ये झालं होतं आणि मनू नेमबाजीत भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वात आश्वासक खेळाडूंपैकी एक आहे. लहान वयापासून मनुला खेळात आवड आहे. 

कसा रंगला अंतिम फेरीचा थरार?
पहिल्या राऊंडपासून 10.6 पॉइंट्स मिळवत मनूने जोरदार सुरुवात केली होती. परंतु कोरियाच्या ओह ये जीन आणि किम येजी यांना टक्कर देणं मनूला जमलं नाही. दुसऱ्या फेरीपर्यंत मनूने स्वतःला पहिल्या तीन स्थानांत ठेवत पदकाची आशा राखली होती. तिसऱ्या फेरीपासून एलिमिनेशन राऊंड सुरु झाला आणि मनूचं लक्ष्य विचलीत झालं. चौथ्या फेरीमध्ये मनूने 9.8, 9.8 असे गुण मिळवल्यामुळे ती तिसऱ्या स्थानावर घसरली. पाचव्या फेरीतही मनूचा पहिला शॉट हुकला, 9.9 गुणांमुळे ती तिसऱ्याच स्थानी राहिली. उर्वरित तीन फेऱ्यांमध्ये पहिल्या दोन स्थानांवर असलेल्या कोरियन खेळाडूंची पिछेहाट झाली. ज्यामुळे एका क्षणापुरती मनू दुसऱ्या स्थानी आली होती. परंतु हा आनंद क्षणिक ठरला. जिन आणि येजी यांनी आपल्या गुणांमधलं अंतर कायम राखत पहिलं-दुसरं स्थान कायम राखलं. कोरियाची ओह ये जीन 243.2 गुणांसह पहिल्या, किम येजी 241.3 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आली. 

Previous Article
Paris Olympics 2024 : मनू भाकर आज अंतिम सामन्यात नेम धरणार!
Breaking : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं पहिलं पदक, मनू भाकरची ऐतिहासिक कामगिरी
Shooter Manu Bhaker Wins Bronze medal in Paris Olympic 2024 journey from Tokyo Olympic 2020
Next Article
पिस्तुलाने दिलेला धोका ते कांस्य पदक... मनू भाकरची दोन ऑलिम्पिकमधील कहाणी