Shreyas Iyer : श्रेयस अय्यरसाठी टेस्ट टीमचे दरवाजे बंद झाले आहेत का? हेड कोच गंभीरनं दिलं उत्तर

Team India Tour to England : श्रेयस सध्या वन-डे आणि T20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फॉर्मात आहे. त्यानंतरही त्याची टेस्ट टीममध्ये निवड न झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Shreyas Iyer : श्रेयस अय्यरसाठी 2025 हे वर्ष जबरदस्त ठरलं आहे. (फोटो - BCCI)
मुंबई:

Team India Tour to England : भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात 20 जूनपासून सुरू होणाऱ्या पाच टेस्टच्या सीरिजसाठी टीम इंडिया इंग्लंडला रवाना झाली आहे. या टीममध्ये श्रेयस अय्यरची  (Shreyas Iyer) निवड झालेली नाही. श्रेयस सध्या वन-डे आणि T20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फॉर्मात आहे. त्यानंतरही त्याची टेस्ट टीममध्ये निवड न झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. श्रेयस अय्यरसाठी टेस्ट टीमचे दरवाजे बंद झाले आहेत का? अशी चर्चा सध्या सुरु आहे. टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरनं (Gautam Gambhir) या चर्चेवर स्पष्टीकरण दिलं आहे, 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे सत्य?

गंभीरने गुरुवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले, 'जो कोणी चांगल्या फॉर्ममध्ये असेल त्याला बोलावले जाऊ शकते. आम्ही फक्त 18 खेळाडू निवडू शकतो. पण, मला वाटते की जे चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि चांगली कामगिरी करू शकतात, त्यांच्यासाठी नेहमीच दरवाजे उघडे ठेवणे महत्त्वाचे आहे."

Advertisement

यापूर्वी, श्रेयसच्या निवडीबद्दल विचारले असता, गंभीरने 'मी निवडकर्ता नाही,' असं वक्तव्य केलं होतं. तर, श्रेयस अय्यरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे, पण सध्या त्याला टेस्ट टीममध्ये (Test Team) जागा नाही, असं निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी टीम जाहीर होताना सांगितलं होतं. 

Advertisement

( नक्की वाचा : Shreyas Iyer : 'श्रेयसनं गुन्हेगारी कृत्य केलं, कोणतीही माफी नाही' माजी क्रिकेटपटू संतापले )
 

श्रेयस जबरदस्त फॉर्मात

श्रेयस अय्यरसाठी 2025 हे वर्ष जबरदस्त ठरले आहे. त्यानं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडियाकडून सर्वात जास्त रन्स करत भारताच्या विजेतेपदात मोलाचं योगदान दिलं. त्यानंतर आयपीएल 2025 मध्ये श्रेयसनं त्याला दिलेल्या 26.75 कोटी रकमेला न्याय दिला. 

Advertisement

( नक्की वाचा : बॉसच्या मागं लागून सुट्टी घेतली, लॅपटॉप टेबलवर ठेवून स्टेडियमकडे पळाली, विराटची जबरी फॅन परतलीच नाही! )
 

श्रेयसनं पंजाब किंग्जला (Punjab Kings) आयपीएल 2025 च्या फायनलमध्ये पोहचवले. तो फ्रँचायझीसाठी सर्वाधिक रन्स करणारा खेळाडू होता, त्याने 17 मॅचमध्ये 175 च्या अप्रतिम स्ट्राइक रेटने 604 रन्स केले.