Shubman Gill: "होय, 2027...."; रोहित-विराटच्या भवितव्यावर कॅप्टन गिलचं ठाम वक्तव्य, निवड समितीला स्पष्ट संदेश

Shubman Gill on Rohit Sharma and Virat Kohli: भारतीय क्रिकेटच्या ‘नेक्स्ट जनरेशन’चा चेहरा आणि वन-डे टीमचा कॅप्टन शुभमन गिलने त्याच्या नेतृत्व शैलीचा रोडमॅप सांगितला आहे

जाहिरात
Read Time: 2 mins
Shubman Gill : टीम इंडियाचा कॅप्टन शुबमन गिलनं मोठं वक्तव्य केलं आहे.
मुंबई:

Shubman Gill on Rohit Sharma and Virat Kohli: भारतीय क्रिकेटच्या ‘नेक्स्ट जनरेशन'चा चेहरा आणि वन-डे टीमचा कॅप्टन शुभमन गिलने त्याच्या नेतृत्व शैलीचा रोडमॅप सांगितला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 19 ऑक्टोबरपासून तो वन-डे टीमचा कॅप्टनीसीची इनिंग सुरु करत आहे. त्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना गिलनं त्याच्या भविष्यातील वाटचालीचे संकेत दिले.  3 सामन्यांची वन-डे सीरिज ही त्याच्या नेतृत्वाची पहिली कसोटी असेल. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टपूर्वी माध्यमांशी बोलताना रोहितकडून प्रेरणा घेतल्याचे त्याने सांगितले. त्याचबरोबर रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन दिग्गज 2027 चा वन-डे वर्ल्ड कप खेळणार की नाही? हे सांगताना निवड समितीलाही एक संदेश दिलाय. 

रोहितकडून काय शिकला गिल?

शुबमन गिलनं रोहितबद्दल बोलताना सांगितलं की, 'रोहित भाईंकडे जो शांतपणा आणि जबरदस्त धैर्य आहे, ते मला आत्मसात करायचं आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यानं टीममध्ये जी 'दोस्ती'ची भावना  तयार केली आहे, ती खूप उपयुक्त ठरते. त्यामुळे टीममध्ये कधीही तणाव नसतो.

( नक्की वाचा : Rohit Sharma : रोहित शर्माला हटवणे कठीण, पण...; 'ती' 3 कारणे देत आगरकरनं फोडलं गुपित )
 

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे ते फक्त वनडे खेळणार आहेत. आता 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकात या दोघांना संघातून वगळले जाणार का, या चर्चांना गिलने उत्तर दिलं आहे. 

“होय, निश्चितच! 2027 मध्येही त्यांची मोठी भूमिका असेल,” असे गिलने ठामपणे सांगितले. “या दोन खेळाडूंनी भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्यांचे कौशल्य, गुणवत्ता आणि अनुभव सहज उपलब्ध होणारे नाही. त्यामुळे आम्हाला त्यांची अत्यंत गरज आहे.” रोहित आणि कोहली लवकरच संघात सामील होणार आहेत आणि 15 ऑक्टोबरपूर्वी संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नवी दिल्लीतून रवाना होईल.

Advertisement

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया

ODI Team: शुभमन गिल (कॅप्टन), श्रेयस अय्यर (व्हाईस कॅप्टन), रोहित शर्मा, विराट कोहली, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकिपर), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), यशस्वी जैस्वाल.

T20 Team: सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (व्हाईस कॅप्टन), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.

Advertisement
Topics mentioned in this article