Smriti Mandhana Wedding Preparation Dance Video Viral: भारतीय महिला क्रिकेट टीमची स्टार बॅटर स्मृती मानधनाचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. जेमिमा रॉड्रिग्जने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केलाय. ज्यामध्ये स्मृती आणि भारतीय क्रिकेट टीममधील तिच्या सहकाऱ्यांनी मुन्नाभाई MBBS सिनेमातील गाजलेल्या लोकप्रिय गाण्यावर ठेका धरल्याचं दिसतंय.
व्हिडीओमध्ये लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे स्मृतीची एंगेजमेंट रिंग. जेमिमा रोड्रिग्ज गंमतीशीर पद्धतीमध्ये तिला विचारतेय की, "ए भाई... हुआ क्या?" यानंतर "समझो हो हो गया…" हे गाणं सुरू होतंय आणि सर्वजणी डान्स करतायेत. स्मृती मानधनाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर स्मृती मानधना लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली. आता या व्हिडीओमुळेतिच्या लग्नाची चर्चा अधिकच जोर धरू लागलीय.
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचे लग्न कधी होणार?
रिपोर्ट्सनुसार, 23 नोव्हेंबर रोजी बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका पलक मुच्छलचा भाऊ आणि संगीतकार पलाश मुच्छलसोबत स्मृती विवाहबंधनात अडकणार आहे.
पलाश मुच्छल कोण आहे?
30 वर्षीय पलाश मुच्छल संगीतकार आणि सिनेनिर्माता आहे. 29 वर्षीय स्मृती मानधनासोबत त्याचा साखरपुडा झालाय. पलाशची मोठी बहीण पलक मुच्छल बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका आहे, जिनं सलमान खान आणि ऋतिक रोशन यासारख्या अभिनेत्यांच्या कित्येक सिनेमांमध्ये गाणी गायली आहेत. आशुतोष गोवारिकर यांच्या 'खेलें हम जी जान से' सिनेमामध्ये अभिषेक बच्चन आणि दीपिका पादुकोणसह मुख्य भूमिका साकारलीय.
(नक्की वाचा: Jemimah Rodrigues Dance Video: दिसते मी भारी...! जेमिमा रॉड्रिग्सने गुलाबी साडी या मराठी गाण्यावर मैदानात धरला ठेका)
पलाशने टी-सीरिज, झी म्युझिक कंपनी आणि पाल म्युझिकसाठी 40 हून अधिक संगीत व्हिडीओ तयार केल्याचे म्हटलं जातं. त्याने रिक्षा नावाची वेब सीरिज देखील दिग्दर्शित केलीय. सध्या तो राजपाल यादव आणि रुबिना दिलाइक स्टारर 'अर्ध' नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
