जाहिरात

World Cup Win: अभिमान! महाराष्ट्राच्या खेळाडूंचा CM फडणवीसांच्या हस्ते गौरव, इतक्या कोटींचं दिलं बक्षीस

World Cup Win: मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी झालेल्या सत्कार समारंभात मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'महाराष्ट्राचा अभिमान' अशा शब्दांत या तीनही खेळाडूंचे वर्णन केले.

World Cup Win: अभिमान! महाराष्ट्राच्या खेळाडूंचा CM फडणवीसांच्या हस्ते गौरव, इतक्या कोटींचं दिलं बक्षीस
"World Cup Win: स्मृती मानधाना, जेमिमा रोड्रिग्स आणि राधा यादवचा सत्कार"
CMO Maharashtra

World Cup Win: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्राच्या खेळाडू उपकर्णधार स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स, राधा यादव आणि मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांचा सत्कार केला. यावेळेस स्मृती मानधना, जेमिमा रोड्रिग्स आणि राधा यादव यांचा सन्मान करत प्रत्येकी 2.25 कोटी रुपयांचे रोख बक्षीसही देण्यात आले. महिला क्रिकेट टीमचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांना 22.5 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला तर सपोर्ट स्टाफमधील प्रत्येक सदस्याला 11 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात टीम इंडियाने 2 नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडिअममध्ये पार पडलेल्या फायनल मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी दणदणीत पराभव करुन इतिहास रचला. या पार्श्वभूमीवर राज्यातील या तीन खेळाडूंचा शुक्रवारी (7 नोव्हेंबर) गौरव करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी झालेल्या सत्कार समारंभात मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'महाराष्ट्राचा अभिमान' अशा शब्दांत या तीनही खेळाडूंचे वर्णन असे केले. टीम इंडियाचा हा विजय तरुण मुलींना खेळांमध्ये सहभागी होण्यासह जागतिक स्तरावर चमकण्यासाठीही प्रोत्साहन देईल. 

Jemimah Rodrigues Favourite Seafood: जेमिमा रॉड्रिग्सला आईने केलेले हे सीफुड खायला प्रचंड आवडतं, नोट करा रेसिपी

(नक्की वाचा: Jemimah Rodrigues Favourite Seafood: जेमिमा रॉड्रिग्सला आईने केलेले हे सीफुड खायला प्रचंड आवडतं, नोट करा रेसिपी)

टीम इंडियाचे टीमवर्क: CM फडणवीस

पुढे मुख्यमंत्री फडणवीस असेही म्हणाले की, "तुम्ही महाराष्ट्राचा गौरव केलाय. तुमच्या विजयामुळे राज्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. सेमिफायनलमध्ये जेमिमाने झळकावलेली सेंच्युरी टर्निंग पॉइंट ठरली, या विजयामुळे आपण फायनलमध्ये धडक मारली. कमबॅक करुन या टीमने एखाद्या कुटुंबाप्रमाणे खेळी खेळली, त्यावरुन टीम वर्क काय असते हे दिसले". 

Jemimah Rodrigues: मी रोज रडायचे...जेमिमा रॉड्रिग्स मानसिकरित्या अस्वस्थ होती, Anxiety वर मात कशी करावी? वाचा

(नक्की वाचा: Jemimah Rodrigues: मी रोज रडायचे...जेमिमा रॉड्रिग्स मानसिकरित्या अस्वस्थ होती, Anxiety वर मात कशी करावी? वाचा)

मुख्यमंत्र्यांनी असेही म्हटलं की, "जगाने भारताला पहिल्यांदाच विश्वचषक जिंकताना पाहिले, जो यापूर्वी पारंपरिकपणे काही निवडक देशांकडे जात होतो. त्यामुळे ही अभिमानाची गोष्ट आहे. टीमने उत्कृष्ट कामगिरी केली. टीमवर्क आणि ताळमेळ साधणे हे यशाचे सीक्रेट आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्ये सहकार्याशिवाय विजय शक्य नाही. प्रशिक्षक, सपोर्टिंग स्टाफ आणि मार्गदर्शकांची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे"

बीसीसीआय आणि आयसीसीचे अध्यक्ष जय शाहा यांनी महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचेही CM फडणवीस यांनी कौतुक केले.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: World Cup Win

...तर विजय शक्य नव्हता: स्मृती मानधाना

"आम्हाला सन्मानित केल्याबद्दल धन्यवाद आणि तेही मुंबईसारख्या ठिकाणी, ज्यामुळे हा क्षण अधिक खास ठरतो. महाराष्ट्राने नेहमीच आम्हाला पाठिंबा दिला आहे. 2017 मध्ये आम्ही उपविजेतेपद पटकावलेले असतानाही आम्हाला सन्मानित करण्यात आले. आमचे बरेच सपोर्ट स्टाफ याच राज्यातील आहेत. त्यांच्या कठोर मेहनतीशिवाय हा विजय शक्य नव्हता", अशी प्रतिक्रिया स्मृती मानधानाने दिलीय. 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: CMO Maharashtra

टीमचं एकच स्वप्न होते ते म्हणजे...:अमोल मुझुमदार 

"जेव्हा आम्ही सेमीफायनल आणि फायनल मॅचसाठी मुंबईमध्ये आलो, तेव्हा आम्हाला उत्साह, आत्मविश्वास होता की येथे काहीतरी ऐतिहासिक गोष्ट घडेल. या खेळाडूंची कौशल्य पातळी कल्पनेच्या पलीकडे आहे. वर्ल्डकप जिंकणे हेच त्यांचं एकमेव स्वप्न होते आणि यासाठी त्यांनी दिवसरात्र मेहनतही घेतली", अशा भावना अमोल मुझुमदार यांनी यावेळेस व्यक्त केल्या. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com