Smriti Mandhana: लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाच्या लेटेस्ट पोस्टचा धुमाकूळ; मौन आणि कंट्रोलबाबत म्हणाली...

Smriti Mandhana: स्मृती मानधनाची आणखी एक पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Smriti Mandhana Latest Instagram Post: स्मृती मानधनाच्या नव्या पोस्टचा धुमाकूळ"
PTI

Smriti Mandhana Latest Instagram Post: भारतीय महिला क्रिकेट टीमची स्टार खेळाडू स्मृती मानधनाची आणखी एक पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. बॉलिवूडचा संगीतकार पलाश मुच्छलसोबत लग्न मोडल्यानंतरचीच ही पोस्ट आहे. व्हिडीओ पोस्ट शेअर करत स्मृतीने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, माझ्यासाठी शांत राहणे म्हणजे मौन नाही, तर ते नियंत्रण आहे. काही तासांतच नेटकऱ्यांनी या पोस्टवर लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय. ही पोस्ट एका स्मार्टफोन ब्रँडच्या पेड प्रमोशनचा भाग आहे. पण तरीही तिच्या या पोस्टने सर्वाचं लक्ष वेधून घेतलंय. दरम्यान स्मृती मानधनाने 7 डिसेंबर रोजी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लग्न मोडल्याचे जाहीर केलं होतं. 

(नक्की वाचा: Smriti Mandhana News: लग्न मोडण्यासह स्मृती मानधनाने पलाश आणि पलक मुच्छलबाबत घेतला आणखी एक मोठा निर्णय)

लग्न मोडल्याचे कारण अस्पष्ट

रिपोर्ट्सनुसार, या वर्षांच्या सुरुवातीस स्मृती आणि पलाशचा साखरपुडा झाला होता. पलाश मुच्छलने लग्नापूर्वी डीवाय पाटील स्टेडिअममध्ये स्मृतीला लग्नासाठीही मागणी घातली होती. याच मैदानात भारतीय महिला क्रिकेट टीमने वर्ल्ड कपची फायनल मॅच जिंकली होती. यानंतर 23 नोव्हेंबर 2025 रोजी स्मृती आणि पलाशचं लग्न होणार होतं. पण संगीत सोहळ्यादरम्यान तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्यानं लग्न पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली होती. यानंतर स्मृतीने थेट लग्न मोडल्याची घोषणा केली. पण लग्न का मोडलं, यामागील कारण अस्पष्ट आहे.

(नक्की वाचा: Smriti Mandhana News: तेरा यार हूं मैं! स्मृती मानधनाचं लग्न मोडलं तर 1-2 नव्हे 9 महिला क्रिकेटर्संनी पलाश मुच्छलचा असा काढला वचपा)

Advertisement

पलाश मुच्छलनेही वैयक्तिक नात्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे शेअर केली. दरम्यान लग्न मोडल्यानंतर स्मृतीने आपल्या ट्रेनिंग लक्ष केंद्रित केलंय.