जाहिरात

Smriti Mandhana: तेरा यार हूं मैं! स्मृतीचं लग्न मोडलं तर 1-2 नव्हे 9 महिला क्रिकेटर्सनी पलाशचा काढला असा वचपा

Smriti Mandhana News: भारतीय महिला क्रिकेट टीममधील 9 खेळाडूंनी पलाश मुच्छलवर असा काढला राग...

Smriti Mandhana: तेरा यार हूं मैं! स्मृतीचं लग्न मोडलं तर 1-2 नव्हे 9 महिला क्रिकेटर्सनी पलाशचा काढला असा वचपा
"Smriti Mandhana News: स्मृतीच्या मैत्रिणींनी पलाश मुच्छलवर असा काढला राग"
Smriti Mandhana Insta

Smriti Mandhana News: टीम इंडियाची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना आणि बॉलिवूडचा संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नसोहळ्याची चाहतेमंडळी आतुरतेने वाट पाहत होते. पण 7 डिसेंबर रोजी स्मृतीने लग्न मोडल्याची अधिकृत घोषणा केली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्मृतीने पहिल्यांदाच लग्नाबाबत थेट प्रतिक्रिया दिली. गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या खासगी जीवनाबाबत चर्चा सुरू आहेत. त्यामुळे लग्न मोडलंय हे मी स्पष्ट करू इच्छिते, असे तिने पोस्टमध्ये नमूद केले होते.   

नऊ महिला क्रिकेटर्संनी पलाश मुच्छलवर असा काढला राग 

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न मोडल्याचे जाहीर होताच सर्वांनाच मोठा धक्का बसला. स्मृतीच्या चाहत्यांसह भारतीय महिला क्रिक्रेट टीममधील खेळाडू देखील पलाश मुच्छलवर नाराज असल्याचे दिसलं. भारतीय महिला क्रिकेट टीममधील एक दोन नव्हे तर तब्बल नऊ खेळांडूनी पलाश मुच्छलला सोशल मीडियावरून अनफॉलो केले. रिपोर्ट्सनुसार जेमिमा रोड्रिग्स, रेणुका सिंह ठाकुर, दीप्ति शर्मा, ऋचा घोष, राधा यादव, श्रेयांका पाटील, अरुंधती रेड्डी, शिवाली शिंदे आणि यास्तिका भाटिया यांनी पलाशला अनफॉलो केलंय. पलाशला अनफॉलो करून त्यांनी एकप्रकारे आपला राग व्यक्त केल्याचे म्हटलं जातंय.

Smriti Mandhana News: लग्न मोडण्यासह स्मृती मानधनाने पलाश आणि पलक मुच्छलबाबत घेतला आणखी एक मोठा निर्णय

(नक्की वाचा: Smriti Mandhana News: लग्न मोडण्यासह स्मृती मानधनाने पलाश आणि पलक मुच्छलबाबत घेतला आणखी एक मोठा निर्णय)

2019मध्ये स्मृती आणि पलाशची झाली होती भेट 

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलची वर्ष 2019मध्ये पहिली भेट मुंबईमध्ये झाली होती. या भेटीनंतर दोघांमध्ये मैत्री झाली, मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं. जवळपास पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय सत्यात उतरू शकला नाही. 

Smriti Mandhana News: लग्न मोडलं... विषय संपवायचाय... स्मृती मानधनाने सोशल मीडियावर शेअर केली पहिली पोस्ट

(नक्की वाचा: Smriti Mandhana News: लग्न मोडलं... विषय संपवायचाय... स्मृती मानधनाने सोशल मीडियावर शेअर केली पहिली पोस्ट)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com