क्रिकेटर गौतम गंभीर यांची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर आता कोलाकाता नाईट रायडरच्या (KKR) मेन्टॉरचं पद रिक्त झालं आहे. राहुल द्रविड केकेआरचा मेन्टॉर बनेल अशी चर्चा सुरु होता. मात्र राहुल द्रविड नाहीतर दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॅक कॅलिस गौतम गंभीरची जागा घेऊ शकतो. जॅक कॅलिसच्या नावाचा कोलकाता नाईट रायडर फ्रॅन्चायजीकडून विचार सुरु आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जॅक कॅलिस क्रिकेट विश्वातील मोठं नाव आहे. आयपीएलमध्ये जॅक कॅलिस कोलाकाता संघाचा देखील भाग होता. द टेलिरामच्या रिपोर्टनुसार, केकेआर टीम मॅनेजमेंट गौतम गंभीरच्या जागी नव्या मेन्टॉरचा शोध घेत आहे. 2019 मध्ये केकेआरला कोचिंग देणाऱ्या जॅक कॅलिसचं नाव आता चर्चेत आहे.
( नक्की वाचा : अखेर शिक्कामोर्तब! गौतम गंभीर बनला टीम इंडियाचा हेड कोच )
जॅक कॅलिस रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघातून 2011 मध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघात पहिल्यांदा सामील झाला होता. कॅलिस संघाचा भाग होता तोपर्यंत केकेआर संघाने दोनदा जेतेपदावर कब्जा केला होता. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर जॅक कॅलिस ऑक्टोबर 2015 मध्ये कोलकाताचा प्रशिक्षकही झाला.
(नक्की वाचा- Gautam Gambhir : द्रविडनं विजेतेपद मिळवून दिलं, नवा हेड कोच गंभीरसमोर आहेत 5 मोठी आव्हानं)
जॅक कॅलिसची कारकीर्द
जॅक कॅलिसने दक्षिण आफ्रिकेसाठी 166 कसोटी, 328 एकदिवसीय आणि 25 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 25 हजार पेक्षा जास्त धावा आणि 577 विकेट घेतल्या. आयपीएलमध्ये त्याने सलग सात हंगामात 98 सामने खेळले. ज्यामध्ये त्याने 2427 धावा केल्या आणि 65 विकेट घेतल्या आहेत. कॅलिसच्या मेन्टॉरशिपचा कोलकाता नाईट रायडर्स संघाला चांगला फायदा होऊ शकतो.