हैदाराबादच्या खेळाडूंना गर्दीने घेरलं; धक्के देत काढावा लागला मार्ग; VIDEO व्हायरल

SRH चे खेळाडू हेनरिक क्लासेन आणि जयदेव उनाडकड यांना गर्दीने घेरलं होतं. मात्र या घटनेनंतर या खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. SRH चे खेळाडू हेनरिक क्लासेन आणि जयदेव उनाडकड यांना गर्दीने घेरल्याचं व्हिडीओत दिसत आहे.. मात्र या घटनेनंतर या खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. @Vipintiwari952_ नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

"हा वेडेपणा आहे. बिचारा क्लासेनला गर्दीने त्रास दिला. मात्र सनरायझर्स हैदराबादच्या मॅनेजमेंटने सुरक्षाव्यवस्था पुरेशी नसताना तिथे एवढी गर्दी कशी येऊ दिली", असा प्रश्न देखील या यूजरने उपस्थित केला. 

(नक्की वाचा- हार्दिक पंड्या आणि शिवम दुबेची जागा धोक्यात? या खेळाडूने टेन्शन वाढवलं)

व्हिडीओत दिसतंय की, हेनरिक क्लासेन आणि जयदेव उनाडकट एका मॉल गेले होते. मात्र तिथे त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. फॅन्स त्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी चढाओढ करताना दिसत आहेत. यावेळी खेळाडूंसोबत काही प्रमाणात धक्काबुक्की झाल्याचंही दिसतंय. मात्र एवढी गर्दी होणार याचा अंदाज असेल तर तेवढ्या प्रमाणात सुरक्षाव्यवस्था तिथे करणे गरजेचं होते. 

(नक्की वाचा- केएल राहुलला वर्ल्ड कपमध्ये संधी का नाही मिळाली?, अजित आगरकरने दिलं उत्तर)

आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबाद जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. या सीजनमध्ये एसआरएचने आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. त्यापैकी 6 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. हैदराबादचा संघ पॉईंटटेबलमध्ये सध्या चौथ्या स्थानावर आहे.  

Advertisement
Topics mentioned in this article