Suryakumar Yadav to Leave Mumbai Indians?: मुंबई इंडियन्सचा स्टार बॅटर सूर्यकुमार यादवचा सध्या बॅड पॅच सुरु आहे. त्याच्याकडून नुकतीच टीम इंडियाच्या T20 टीमची कॅप्टनसी काढून घेण्यात आलीय. तसंच त्याला टीममधूनही वगळण्यात आलंय. आता त्याच्या करिअरच्या या अवघड वळणावर त्याला पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करावे लागणार भारतीय टीममध्ये पुनरागमन करण्याचे मोठे आव्हान त्याच्यासमोर असतानाच, आता मुंबई इंडियन्ससोबतचा त्याचा प्रवासही संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोमवारच्या सकाळी सूर्यकुमारच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर मुंबई इंडियन्सशी संबंधित एकही फोटो किंवा उल्लेख चाहत्यांना दिसला नाही. यामुळे त्याने मुंबई इंडियन्सची साथ सोडल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
का सुरु झाली चर्चा?
सूर्यकुमार यादव 2018 मध्ये कोलकाता नाईट रायडर्समधून मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये सामील झाला होता. गेल्या काही वर्षांत त्याने आयपीएलमध्ये मुंबईच्या यशात खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र आयपीएल 2026 चा मोसम त्याच्यासाठी आणि मुंबई इंडियन्ससाठी अत्यंत खराब राहिला. याच कारणामुळे बहुदा मुंबईच्या मॅनेजमेंटने आता इतर पर्यायांचा विचार करण्यास सुरुवात केली आहे.
सूर्यकुमार इंस्टाग्रामवर ज्या अकाउंट्सना फॉलो करत आहे, त्यामध्ये मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पंड्या यांचे अकाउंट्स दिसत नाही आहेत. सूर्यकुमारच्या इंस्टाग्रामवर मुंबईच्या टीमचा फक्त एकच फोटो शिल्लक आहे, ज्यामध्ये तो रोहित शर्मा आणि एमएस धोनी या भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडूंसोबत दिसत आहे.
Suryakumar Yadav removed Mumbai Indians and Mumbai from his bio. He unfollowed Mumbai Indians. MI unfollowed him. He deleted all MI related pics and videos from his insta id. He changed his pfp too.
— SKY n Supla Shot (@sky_63_mr_t20i) June 7, 2026
What's cooking? pic.twitter.com/PL6ErA6tDc
आयपीएल 2026 च्या मोसमात सूर्यकुमारने मुंबई इंडियन्ससाठी खेळताना फक्त 270 रन केले. यादरम्यान त्याची सरासरी 20.77 ची राहिली आणि त्याला संपूर्ण मोसमात केवळ 2 हाफ सेंच्युरी झळकावल्या. मुंबई इंडियन्सच्या सुमार कामगिरीत सूर्याच्या खराब फॉर्मचंही योगदान होतं. मुंबई इंडियन्सची टीम 10 टीमच्या पॉईंट्स टेबलमध्ये 9 व्या क्रमांकावर फेकली गेली होती.
( नक्की वाचा : टीम इंडियामध्ये मोठा ड्रामा! हार्दिक आणि सूर्या चांगले मित्र नाहीत? नव्या रिपोर्टमुळे उलट-सुलट चर्चांना उधाण )
अश्विनला वाटतंय वाईट
भारतीय टी20 टीममध्ये सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यरला आणण्याच्या निर्णयानंतर क्रिकेट जगतातून सातत्याने वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. भारताचा अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे. टीममधून बाहेर काढल्यानंतर सूर्यकुमारला किती वाईट वाटत असेल, हे आपण समजू शकतो असे अश्विनने म्हटले आहे.
अश्विनने एका क्रीडा संकेतस्थळाशी बोलताना सांगितले की, हा एक खूप वेगळा निर्णय आहे. मी स्वतःला सूर्यकुमारच्या जागी ठेवून विचार करतोय की त्याला या वेळी कसे वाटत असेल. प्रत्येक खेळाडूला टीममधून बाहेर पडल्यानंतर दुःख होणे साहजिक आहे आणि त्याला वाईट वाटणे अगदी योग्य आहे.
( नक्की वाचा : Shreyas Iyer : कोच गंभीरचा सल्ला धुडकावून निवड समितीला का केलं अय्यरला कॅप्टन? वाचा 4 प्रमुख कारणं )
अश्विनने पुढे म्हटले की, ही संपूर्ण प्रक्रिया ज्या पद्धतीने पार पडली, त्यामुळे मला थोडी काळजी वाटते. गेल्या 15 ते 18 महिन्यांत सूर्यकुमारचा बॅटिंग फॉर्म नक्कीच खराब राहिला असेल आणि तो त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नसेल, हे मला मान्य आहे. पण आपण हे विसरून चालणार नाही की त्याने देशासाठी टी20 वर्ल्ड कप जिंकून दिला आहे. सिलेक्शन कमिटीने या गोष्टीचा विचार केला नसावा असे अश्विनला वाटते. एक बॅटर म्हणून त्याचा वर्ल्ड कप फारसा चांगला गेला नसेल, पण टीममधील इतर खेळाडू, कोच आणि व्हाईस कॅप्टनप्रमाणेच त्यानेही एक कॅप्टन म्हणून आपली भूमिका चोख बजावली होती, असे अश्विनने स्पष्ट केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world