जाहिरात

टीम इंडियामध्ये मोठा ड्रामा! हार्दिक आणि सूर्या चांगले मित्र नाहीत? नव्या रिपोर्टमुळे उलट-सुलट चर्चांना उधाण

Hardik Pandya Suryakumar Yadav rift: भारतीय टी20 टीमचा माजी कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या यांच्यात गेल्या 2 वर्षांपासून सलोख्याचे संबंध नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

टीम इंडियामध्ये मोठा ड्रामा! हार्दिक आणि सूर्या चांगले मित्र नाहीत? नव्या रिपोर्टमुळे उलट-सुलट चर्चांना उधाण
Hardik Pandya Suryakumar Yadav
मुंबई:

Hardik Pandya Suryakumar Yadav rift: भारतीय क्रिकेटच्या वर्तुळातून एक अतिशय खळबळजनक वृत्त समोर आले असून दोन दिग्गज खेळाडूंमधील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. मैदानावर एकत्र खेळणारे आणि देशाचे प्रतिनिधित्व करणारे हे दोन स्टार खेळाडू एकमेकांचे पक्के मित्र नसल्याचा मोठा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. भारतीय ड्रेसिंग रूममधील हे सर्वात मोठे 'ओपन सीक्रेट' असल्याचे बोलले जात आहे. या दोन खेळाडूंमधील वादाची ठिणगी कशी पडली, याबद्दलची धक्कादायक माहिती समोर आलीय.

हार्दिक आणि सूर्यामध्ये 'ऑल इज नॉट वेल'

भारतीय टी20 टीमचा माजी कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या यांच्यात गेल्या 2 वर्षांपासून सलोख्याचे संबंध नसल्याचा दावा करण्यात आला आहे. 2024 मध्ये जेव्हा भारतीय टीम वेस्टइंडिजमधून टी20 वर्ल्ड कप जिंकून परतली, तेव्हा हार्दिक पंड्याकडे कॅप्टन्सी सोपवली जाणार हे जवळपास निश्चित होते.

मात्र, नवीन कोच गौतम गंभीर आणि चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांनी हार्दिकच्या मुंबई इंडियन्स मधील कॅप्टन्सीचा रेकॉर्ड पाहून सूर्यकुमार यादवला कॅप्टन बनवण्याचा निर्णय घेतला. या निवडी दरम्यान एका अतिशय सीनियर खेळाडूने देखील सूर्याच्या बाजूने मत दिले होते, ज्यामुळे हार्दिक आणि सूर्यामधील दरी आणखी वाढल्याचे समजते.

( नक्की वाचा : Shreyas Iyer : कोच गंभीरचा सल्ला धुडकावून निवड समितीला का केलं अय्यरला कॅप्टन? वाचा 4 प्रमुख कारणं )
 

कॅप्टन्सीच्या नादात बॅटिंग फॉर्मकडे दुर्लक्ष

सूर्यकुमार यादवने कॅप्टन झाल्यानंतर तो एक उत्तम बॅटर आहे हेच विसरल्याचे त्याच्या कामगिरीवरून दिसून आले. 2025 मध्ये खेळलेल्या 19 टी20 इनिंग्जमध्ये सूर्याला केवळ 218 रन करता आले. या खराब फॉर्मबद्दल जेव्हा एका कार्यक्रमात विद्यार्थ्याने विचारले, तेव्हा सूर्याने 'माझे 14 सैनिक माझ्यासाठी धावून येत आहेत, ज्या दिवशी मी खेळेन त्या दिवशी धमाका होईल' असे उत्तर दिले होते. 

सातत्याने अपयशी ठरणाऱ्या कॅप्टनचा ड्रेसिंग रूममधील आदर कमी होतो, याचे भान सूर्याला राहिले नाही. टी20 वर्ल्ड कप 2026 मधील विजयाने त्याचा खराब फॉर्म झाकला गेला असला, तरी अमेरिकेविरुद्धची एक मॅच सोडली तर तो संपूर्ण टूर्नामेंटमध्ये फ्लॉप ठरला होता.

( नक्की वाचा : 6, 6, 6, 6, 6, 6, 6... वैभव सूर्यवंशीनं मोडला ख्रिस गेलचा सर्वात मोठा रेकॉर्ड, मिळालं नवं नाव! )
 

'सुपला शॉट' ठरला आंतरराष्ट्रीय करिअरचा शेवट

एक काळ असा होता जेव्हा सूर्यकुमार यादव मैदानावर अद्भूत फटकेबाजी करत असे. मनगटाचा वापर करून खेळला जाणारा त्याचा प्रसिद्ध 'सुपला शॉट' हा फ्लिक आणि शॉर्ट-आर्म पुल यांचे मिश्रण होता, ज्याने टी20 क्रिकेटची व्याख्या बदलली. पण 2023 च्या ओडीआय वर्ल्ड कप दरम्यान माजी हेड कोच राहुल द्रविड यांनी सूर्याला मैदानावर इतर दिशांनाही खेळण्याचा सल्ला दिला होता, ज्याकडे त्याने दुर्लक्ष केले. 

बॉलरनी त्याच्या शरीराच्या रेषेत सरळ बॉल टाकून त्याला बाद करण्याची रणनीती आखली. हीच रणनीती ओडीआय नंतर आता त्याच्या टी20 करिअरच्या अंतालाही कारणीभूत ठरली आहे. 2024 च्या दुलीप ट्रॉफीमध्येही अर्शदीप सिंगविरुद्ध पहिल्याच बॉलवर असा शॉट मारण्याचा प्रयत्न केल्याने सिलेक्टर कमालीचे नाराज झाले होते.

आशिया कपमधील वाद 

आशिया कप दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला होता. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानला 3 वेळा हरवले. एका मॅचनंतर पाकिस्तानच्या सलमान अली आघासोबत हस्तांदोलन न केल्याने सूर्या भारतीय फॅन्ससाठी हिरो ठरला, पण या काळात त्याचा स्वतःचा फॉर्म अत्यंत खराब होता. 

संपूर्ण आशिया कपमधील 6 इनिंग्जमध्ये त्याने केवळ 72 रन केले होते. एका पत्रकाराने फॉर्मबद्दल विचारले असता, 'मी आउट ऑफ रन आहे, आउट ऑफ फॉर्म नाही' असा दावा सूर्याने केला. तो नेहमी रोहित शर्मासारखे विनोद पत्रकार परिषदेत करण्याचा प्रयत्न करत असे. पण, रोहितचे विनोद हे सहज होते. तर सूर्या मात्र  सूर्या मात्र स्टँड-अप कॉमेडी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसायचा.

भविष्यातील स्वप्ने आणि करिअरचा शेवट

वयाची 35 वर्षे पूर्ण केलेल्या सूर्यकुमार यादवचे आंतरराष्ट्रीय करिअर आता संपल्यात जमा आहे. भारतासाठी 113 टी20 मॅचेसमध्ये 3,272 रन करणाऱ्या सूर्याने लॉस एंजेलिस 2028 ऑलम्पिक आणि 2028 टी20 वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न बोलून दाखवले होते. 

यावर, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट शब्दांत सुनावले की, स्वप्न पाहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, मग ते 2032 चे ब्रिस्बेन असो की 2036 चे अहमदाबाद ऑलम्पिक, पण टीममध्ये जागा मिळवण्यासाठी फक्त आणि फक्त रन करावे लागतील. यानंतर आयपीएल मध्येही त्याची कामगिरी अत्यंत सुमार राहिली आणि अखेर एका मोठ्या वादळासारखी एंट्री करणाऱ्या या महान बॅटरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रवास अत्यंत शांततेत संपला.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com