Nitish Rana-Ayush Badoni Engage In A Heated Exchange: सय्यद मुश्ताक अली स्पर्धा सध्या रंगतदार टप्प्यावर आहे. या स्पर्धेची दुसरी क्वार्टर फायनल दिल्ली विरुद्ध उत्तर प्रदेश यांच्यात झाली. दिल्लीनं हा सामना 19 रननं जिंकला. या मॅचच्या दरम्यान दिल्लीच्या आजी आणि माजी खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाला. दिल्लीचा कॅप्टन आयुष बदोनी आणि उत्तर प्रदेशचा अनुभवी खेळाडू नितीश राणा यांच्यात हा वाद झाला.हे प्रकरण इतकं चिघळलं की दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना मारहाण करणार का अशी भीती वाटत होती. अखेर मैदानातील अंपायर्सनी मध्यस्थी करत त्याचं भांडण सोडवलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नेमकं काय घडलं?
भर मैदनात दोन्ही खेळाडूंमध्ये झालेल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिल्लीची बॅटिंग सुरु असताना हा प्रकार घडला. उत्तर प्रदेशकडून नितीश राणा बॉलिंग करत होता. आयुषनं राणानं टाकलेला बॉल टोलावला आणि रन काढण्यासाठी पळत होता, त्यावेळी अचानक राणा त्याच्याकडं आला आणि त्यानं अपशब्द वापरले. आयुष बदोनीनंही त्याला उत्तर दिलं. दोघांमधील वाद वेगळं वळण घेण्यापूर्वीच मैदानातील अंपायरनं हस्तक्षेप करत हे प्रकरण शांत केलं.
Heated Moment between Nitish Rana and Ayush Badoni in SMAT 20 Match. pic.twitter.com/4G6u9xUKKx
— CricVik (@VikasYadav66200) December 11, 2024
आजी आणि माजी दिल्लीकर
नितीश राणा आणि आयुष बदोनी हे दोघंही एकत्र दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळले आहेत. पण, या सिझनमध्ये राणा उत्तर प्रदेशकडून खेळत आहे. तर आयुष बदोनी दिल्लीचा कॅप्टन आहे.
( नक्की वाचा : यशस्वी जैस्वालकडून मोठी चूक, रोहित शर्मा संतापला, तरुण खेळाडूला मिळाली शिक्षा )
दिल्लीचा विजय
बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या समान्यात दिल्लीनं पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 3 आऊट 193 रन केले. उत्तर प्रदेशला हे आव्हान पेलवलं नाही. त्यांना 20 ओव्हर्समध्ये 174 पर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे दिल्लीनं हा सामना 19 रननं जिंकला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world