जाहिरात

यशस्वी जैस्वालकडून मोठी चूक, रोहित शर्मा संतापला, तरुण खेळाडूला मिळाली शिक्षा

Yashasvi Jaiswal : भारतीय टीम ब्रिस्बेनला रवाना होत असताना यशस्वी जैस्वालकडून एक चूक घडली. त्यामुळे कॅप्टन रोहित शर्मा चांगलाच संतापला.

यशस्वी जैस्वालकडून मोठी चूक, रोहित शर्मा संतापला, तरुण खेळाडूला मिळाली शिक्षा

Yashasvi Jaiswal : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील तिसरी टेस्ट शनिवारपासून ब्रिस्बेनमध्ये सुरु होत आहे. यापूर्वीची डे-नाईट टेस्ट तीन दिवसांमध्ये आटोपली. त्यामुळे टीम इंडिया बुधवारी अ‍ॅडलेडहून ब्रिस्बेनला रवाना झाली. भारतीय टीम ब्रिस्बेनला रवाना होत असताना यशस्वी जैस्वालकडून एक चूक घडली. त्यामुळे कॅप्टन रोहित शर्मा चांगलाच संतापला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

का संतापला रोहित?

भारतीय क्रिकेट टीमला ऑस्ट्रेलियातील स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता ब्रिस्बेनला जाणारं विमान पकडायचं होतं. त्यामुळे त्यांना सकाळी 8.30 वाजता हॉटेलमधून बाहेर पडायचं होतं. संपूर्ण टीम 8.20 मिनिटांनी हॉटेलच्या लॉबीमध्ये होती. पण,यशस्वीचा काही पत्ता नव्हता. सर्वजण पुढील 10 मिनिटांमध्ये टीमच्या बसमध्येही बसले. तरीही यशस्वी आला नव्हता. 

यशस्वीचा काहीच पत्ता नसल्यानं टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा चांगलाच संतापला होता, असं वृत्त 'स्पोर्ट्स तक' नं दिलं आहे. रोहितनं टीम बस हॉटेलमधून विमानतळाकडं नेण्याची सूचना दिली. त्यानंतर टीम मॅनेजर आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकारी खाली उतरले. टीम यशस्वीशिवाय विमानतळाच्या दिशेनं रवाना झाली.

IND vs AUS : रोहित शर्माला शमी टीममध्ये नकोय? धक्कादायक रिपोर्टनं क्रिकेट विश्वात खळबळ

( नक्की वाचा :  IND vs AUS : रोहित शर्माला शमी टीममध्ये नकोय? धक्कादायक रिपोर्टनं क्रिकेट विश्वात खळबळ )

टीम बस रवाना झाल्यानंतर तब्बल 20 मिनिटांनी यशस्वी हॉटेल लॉबीमध्ये आला. त्यानंतर तो आणि टीमचे सुरक्षा अधिकारी आणि मॅनेजर एका स्पेशल कारनं विमानतळासाठी रवाना झाले. त्यासर्वांनी  अन्य सदस्यांसोबत 10 वाजता ब्रिस्बेनला जाणारं विमान पकडलं. 

या प्रकरणात टीम मॅनेजमेंटकडून कोणतंही स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेलं नाही. यशस्वी जैस्वाल हा सामान्यत: शिस्तबद्ध क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. त्याच्याकडून ही चूक कशी झाली? तो नियोजित वेळेत बस पकडण्यासाठी का पोहोचला नाही? त्यानं टीम मॅनेजमेंटला उशीर होणार असल्याची कल्पना दिली होती का? हे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com