Hardik Pandya for T20 World Cup: वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत जून महिन्यात टी20 वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा लवकरच होणार आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवड समिती 15 जणांची नावं जाहीर करेल. या टीममध्ये हार्दिक पांड्याच्या निवडीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्ये हार्दिकची कामगिरी साधारण होतीय. त्याचवेळी अन्य खेळाडूंनी दमदार खेळाच्या जोरावर दावेदारी सादर केलीय.
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma), हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि निवड समितीमध्ये झालेल्या बैठकीत हार्दिकबाबत चर्चा झाली. 'इंडियन एक्स्प्रेस' मधील वृत्तानुसार
बॉलर म्हणून अपयशी
हार्दिक पांड्याची या आयपीएलमध्ये बॉलर म्हणून साधारण कामगिरी झाली आहे. त्यानं आत्तापर्यंतच्या 6 मॅचमध्ये फक्त 4 मॅचमध्ये बॉलिंग केलीय. त्यानं गुजरात टायटन्सविरुद्ध 3, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 4 ओव्हर बॉलिंग केली. त्यानंतर पुढच्या दोन मॅचमध्ये बॉलिंग केली नाही. त्यानंतर आरसीबीविरुद्ध 1 तर सीएसकेविरुद्ध 3 ओव्हर्स बॉलिंग केली. त्याच्या बॉलिंगमध्ये पूर्वीसारखी भेदकता दिसत नाहीय. सीएसकेविरुद्धच्या मॅचमध्ये महेंद्रसिंह धोनीनं सलग तीन सिक्स लगावले होते.
कोण आहेत दावेदार?
भारतीय टीममधील हार्दिक पांड्याच्या जागेसाठी शिवम दुबे प्रबळ दावेदार आहे. त्यानं चेन्नई सुपर किंग्सकडून दमदार कामगिरी केलीय. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्सकडून सातत्यपूर्ण कामगिरी करणारा रियान पराग हा देखील पर्याय निवड समितीसमोर आहे. याच कारणांमुळे हार्दिकची टीम इंडियातील जागा सध्या अनिश्चित आहे.