जाहिरात
Story ProgressBack

T20 वर्ल्ड कपमधून हार्दिक पांड्या आऊट? BCCI नं ठेवली अट

T20 World Cup : एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवड समिती 15 जणांची नावं जाहीर करेल. या टीममध्ये हार्दिक पांड्याच्या निवडीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Read Time: 2 min
T20 वर्ल्ड कपमधून हार्दिक पांड्या आऊट? BCCI नं ठेवली अट
Hardik Pandya : हार्दिक पांड्याची जागा धोक्यात (फोटो - BCCI)
मुंबई:

Hardik Pandya for T20 World Cup:  वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत जून महिन्यात टी20 वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा लवकरच होणार आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवड समिती 15 जणांची नावं जाहीर करेल. या टीममध्ये हार्दिक पांड्याच्या निवडीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्ये हार्दिकची कामगिरी साधारण होतीय. त्याचवेळी अन्य खेळाडूंनी दमदार खेळाच्या जोरावर दावेदारी सादर केलीय.

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma), हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि निवड समितीमध्ये झालेल्या बैठकीत हार्दिकबाबत चर्चा झाली. 'इंडियन एक्स्प्रेस' मधील वृत्तानुसार

हार्दिकच्या कामगिरीवर निवड समितीचं बारीक लक्ष आहे. त्यानं आयपीएलमधील सामन्यात नियमित बॉलिंग केली तरच त्याची टीममध्ये निवड होईल. हार्दिकनं या सिझनमध्ये नियमित बॉलिंग केलेली नाही, त्यामुळे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

बॉलर म्हणून अपयशी

हार्दिक पांड्याची या आयपीएलमध्ये बॉलर म्हणून साधारण कामगिरी झाली आहे. त्यानं आत्तापर्यंतच्या 6 मॅचमध्ये फक्त 4 मॅचमध्ये बॉलिंग केलीय. त्यानं गुजरात टायटन्सविरुद्ध 3, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 4 ओव्हर बॉलिंग केली. त्यानंतर पुढच्या दोन मॅचमध्ये बॉलिंग केली नाही. त्यानंतर आरसीबीविरुद्ध 1 तर सीएसकेविरुद्ध 3 ओव्हर्स बॉलिंग केली. त्याच्या बॉलिंगमध्ये पूर्वीसारखी भेदकता दिसत नाहीय. सीएसकेविरुद्धच्या मॅचमध्ये महेंद्रसिंह धोनीनं सलग तीन सिक्स लगावले होते.   

कोण आहेत दावेदार?

भारतीय टीममधील हार्दिक पांड्याच्या जागेसाठी शिवम दुबे प्रबळ दावेदार आहे. त्यानं चेन्नई सुपर किंग्सकडून दमदार कामगिरी केलीय. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्सकडून सातत्यपूर्ण कामगिरी करणारा रियान पराग हा देखील पर्याय निवड समितीसमोर आहे. याच कारणांमुळे हार्दिकची टीम इंडियातील जागा सध्या अनिश्चित आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination