T20 वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न भंगलं, KL राहुलसह 5 जणांची निराशा

T20 World Cup 2024 : टी 20 वर्ल्ड कपसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय टीममध्ये  कोणत्या 5 प्रमुख खेळाडूंना जागा मिळालेली नाही पाहूया

जाहिरात
Read Time: 2 mins
KL राहुलनं वन-डे वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी केली होती. (फोटो सौजन्य BCCI/IPL)
मुंबई:

गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेट फॅन्समध्ये असलेली उत्सुकता अखेर संपलीय. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत जून महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी 15 जणांची टीम बीसीसीआयनं जाहीर केलीय. रोहित शर्मा या टीमचा कॅप्टन असून हार्दिक व्हाईस कॅप्टन आहे. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं या टीममध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न केलाय. या टीममध्ये 4 बॅट्समन, 2 विकेट किपर, 4 ऑलराऊंडर, 2 स्पिनर आणि 3 फास्ट बॉलर्सचा समावेश करण्यात आला आहे. तर चार जण राखीव आहेत.  

टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी निवडण्यात आलेल्या भारतीय टीममध्ये  कोणत्या 5 प्रमुख खेळाडूंना जागा मिळालेली नाही पाहूया

केएल राहुल

रोहित शर्मा आणि विराट कोहलीनंतरचा प्रमुख भारतीय फलंदाज असलेल्या केएल राहुलचा वर्ल्ड कप टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाही. राहुलनं वन-डे वर्ल्ड कपमध्ये विकेट किपरची जबाबदारीही चोख सांभाळली होती. सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्ये तो लखनौ सुपर जायंट्सचा कॅप्टन आहे. राहुलच्या जागी विकेट किपर म्हणून ऋषभ पंत आणि संजू सॅमसनला निवड समितीनं पसंती दिलीय. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

इशान किशन

आक्रमक बॅटर आणि विकेट किपर असलेला इशान किशन वन-डे वर्ल्ड कपपर्यंत भारतीय टीमचा नियमित सदस्य होता.  वर्ल्ड कपनंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून इशाननं वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली होती. त्यानंतर तो भारतीय टीमच्या बाहेर आहे.

Advertisement

ऋतुराज गायकवाड

चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन असलेला ऋतुराज गायकवाड या आयपीएलमध्ये दमदार फॉर्मात आहे. त्यानं आत्तापर्यंत 9 मॅचमध्ये 1 शतक आणि 3 अर्धशतकांसह 447 रन्स केले आहेत. काही दिवसांपूर्वीच सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध त्यानं 54 बॉलमध्ये 98 रन काढले होते. त्यामुळे त्याची वर्ल्ड कप टीममध्ये निवड होईल अशी जोरदार चर्चा होती. 

( नक्की वाचा : विराट, रोहित नाही तर T20 वर्ल्ड कपमध्ये हा खेळाडू असेल X फॅक्टर, युवराजची भविष्यवाणी )
 

श्रेयस अय्यर

श्रेयस अय्यरनं वन-डे वर्ल्ड कपमध्ये प्रभावी कामगिरी केली होती. त्यानंतर त्याचा फॉर्म घसरला. इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजच्या दरम्यान त्याला टीममधून वगळण्यात आलं होतं. सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्येही तो निवड समितीचं लक्ष वेधण्यात अपयशी ठरलाय.

Advertisement

रवी बिश्नोई

टीम इंडियाचा तरुण लेग स्पिन रवी बिश्नोई गेल्या काही वर्षांपासून चांगली कामगिरी करतोय. त्यामुळे त्याची निवड निश्चित मानली जात होती. या आयपीएलमध्ये त्याला फारसा प्रभाव टाकता आलेला नाही. बिश्नोईनं आत्तापर्यंतच्या 9 मॅचमध्ये फक्त 5 विकेट्स घेतल्या आहेत. बिश्नोईच्या जागी युजवेंद्र चहल या अनुभवी लेगस्पिनरवर निवड समितीनं विश्वास दाखवला आहे.