जाहिरात
Story ProgressBack

विराट, रोहित नाही तर T20 वर्ल्ड कपमध्ये हा खेळाडू असेल X फॅक्टर, युवराजची भविष्यवाणी

 Yuvraj Singh on T20 World Cup 2024 : युवराज सिंहनं आगामी वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीममधील X फॅक्टरचं नाव सांगितलं आहे.

Read Time: 2 mins
विराट, रोहित नाही तर T20 वर्ल्ड कपमध्ये हा खेळाडू असेल X फॅक्टर, युवराजची भविष्यवाणी
T20 World Cup 2024 : जून महिन्यात T20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. (फोटो सौजन्य BCCI )
मुंबई:


 Yuvraj Singh on Key Indian player for T20 World Cup 2024: अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये जून महिन्यात T20 वर्ल्ड कप होणार आहे. भारतीय टीम या वर्ल्ड कप विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या आपल्या टीममध्ये अनेक मॅचविनर्स आहेत. यामधील X फॅक्टर कोण असेल याचं भविष्य युवराज सिंहनं सांगितलंय.

मर्यादीत ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये युवराज हा भारताचा बेस्ट ऑलराऊंडर मानला जातो. भारतीय टीमला 2007 साली झालेला टी20 वर्ल्ड कप जिंकून देण्यात त्याची कामगिरी निर्णायक ठरली होती. त्यामुळे युवराजच्या भविष्यवाणीला मोठं महत्त्व आहे.

युवराज सिंहनं आयसीसीला मुलाखत देताना भारतीय टीमच्या कामगिरीबाबत मत मांडलंय. त्याचबरोबर कोणत्या चार टीम सेमी फायनलला येतील, याचाही अंदाज व्यक्त केलाय. भारताला वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) कमाल करावी लागेल, असं युवराजनं सांगितलं. भारतीय टीममधील सूर्या हा X फॅक्टर असल्याचं युवराजनं सांगितलं.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सूर्या हा T20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा अतिशय महत्त्वाचा फलंदाज असल्याचं युवराजनं सांगितलं. 'सूर्या फक्त 15 बॉल खेळूनही मॅचचं चित्र बदलू शकतो. भारताला यंदा टी20 वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर सूर्याला त्याची सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. स्वत:च्या खेळाच्या जोरावर मॅचचं पारडं बदलण्याचं क्षमता त्याच्या खेळात आहे,' असा विश्वास युवराजनं व्यक्त केला.

( नक्की वाचा : संजय मांजरेकरनं निवडली T20 वर्ल्ड कपची टीम, विराटसह 3 प्रमुख खेळाडू बाहेर )
 

भारतानं आजवर फक्त एकदा 2007 साली T20 वर्ल्ड कप जिंकलाय. त्या वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंह सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता. त्यानं इंग्लडचा फास्ट बॉलर स्टुअर्ट ब्रॉडच्या 6 बॉलमध्ये 6 सिक्स लगावले होते. त्याचबरोबर 12 बॉलमध्येच अर्धशतक झळकावण्याचा रेकॉर्ड केला होता. 

कोणत्या टीम सेमी फायनलला जाणार?

आगामी T20 वर्ल्ड कपमध्ये कोणत्या 4 टीम सेमी फायनलला जाणार त्याचं नावंही युवराजनं सांगितलंय. युवराजच्या मते, 'भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या 4 टीम T20 वर्ल्ड कपची सेमी फायनल गाठू शकतात

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
टी-20 इतिहासातील 'रेकॉर्ड ब्रेक' सामना; कोलकाता विरुद्ध पंजाब सामन्यात हे 5 विक्रम मोडीत
विराट, रोहित नाही तर T20 वर्ल्ड कपमध्ये हा खेळाडू असेल X फॅक्टर, युवराजची भविष्यवाणी
IPL 2024 Mumbai Indians vs Delhi Capitals  Jake Fraser McGurk smashed 27 balls 84 runs know his journey
Next Article
माकड चावल्यानं सोडला होता वर्ल्ड कप, आता घालतोय IPL मध्ये धुमाकूळ
;