T20 WC : सुपर 8 फेरीसाठी 7 संघ पात्र, कसं असेल संपूर्ण वेळापत्रक?

T20 World Cup Super 8 : टीम इंडियाला अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरोधात साधव खेळ करावा लागणार आहे. दोन्ही संघांनी आपल्या ग्रुपमध्ये चांगला खेळ केला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

टी 20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 फेरीसाठी इंग्लंडचा संघ क्वालीफाय झाला आहे. आतापर्यंत 7 संघ सुपर 8 साठी पात्र झाले आहेत. आता बांगलादेश की नेदरलँड कोणता संघ सुपर 8 मध्ये जाणार हे पाहावं लागेल. बांगलादेशचा संघ पात्र होण्याची शक्यता दाट आहे. कारण बांगलादेशचा संघ नेपाळविरोधात भिडणार आहे. हा सामना जिंकताच बांगालादेश सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. येत्या 19 जूनपासून सुपर 8 फेरीला सुरुवात होणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सुपर 8 मधील भारताचे सामने

भारतीय संघ 20 जून रोजी अफगाणिस्तानविरोधात आपला पहिला सामना खेळणार आहे. त्यानंतर 22 जून रोजी भारतीय संघ आपला दुसरा सामना बांगलादेश किंवा नेदरलँडविरोधात खेळणार आहे. त्यानंतर 24 जून रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा सामना होणार आहे.  

टीम इंडियाला अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरोधात साधव खेळ करावा लागणार आहे. दोन्ही संघांनी आपल्या ग्रुपमध्ये चांगला खेळ केला आहे. अफगाणिस्तानने न्यूझीलंडला पराभूत करत वर्ल्ड कपमध्ये मोठा उलटफेर केला आहे. 

(नक्की वाचा - T20 WC शेवटच्या बॉलवर जिंकता-जिंकता हरलं नेपाळ, लहान मुलासारखा रडू लागला खेळाडू)

सुपर 8 मधील ग्रुप

  • ग्रुप-1 : भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांग्लादेश/नेदरलँड    
  • ग्रुप-2- इंग्लंड, अमेरिका, दक्षिण अफ्रीका,  वेस्ट इंडीज

सुपर 8 चं संपूर्ण वेळापत्रक

  • अमेरिका वि. दक्षिण आफ्रिका (19 जून, रात्री 8 वाजता)
  • इंग्लंड वि. वेस्ट इंडीज (20 जून, सकाळी 6 वाजता)
  • अफगाणिस्तान वि. भारत (20 जून, सकाळी 8 वाजता)
  • ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश/नेदरलँड (21 जून, सकाळी 6 वाजता)
  • इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका (21 जून, सकाळी 8 वाजता)
  • अमेरिका वि. वेस्ट इंडीज (22 जून, सकाळी 6 वाजता)
  • भारत वि. बांगलादेश/नेदरलँड (22 जून, सकाळी 8 वाजता)
  • अफगाणिस्तान वि. ऑस्ट्रेलिया (23 जून, सकाळी 6 वाजता)
  • अमेरिका विरुद्ध इंग्लंड (23 जून, रात्री 8 वाजता)
  • वेस्ट इंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रिका (24 जून सकाळी 6 वाजता)
  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (24 जून, रात्री 8 वाजता)
  • अफगाणिस्तान विरुद्ध बांगालदेश/नेदरलँड (25 जून, सकाळी 6 वाजता)
Topics mentioned in this article