सध्या सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2024) टीम इंडियाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळणार आहे. भारतीय टीमचा सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडची मुदत या वर्ल्ड कपनंतर संपणार आहे. द्रविडनं या पदासाठी पुन्हा अर्ज न करण्याचा निर्णय घेतलाय. याबाबतच्या वृत्तानुसार केकेआरचा मेन्टॉर आणि माजी सलामीवीर गौतम गंभीर पुढचा मुख्य प्रशिक्षक होण्याची आता फक्त औपचारिकता बाकी आहे. बीसीसीआयनं गंभीरच्या बहुतेक अटी मान्य केल्या आहेत. गंभीरला त्याच्या मनानुसार सपोर्ट स्टाफ देण्यात येईल. याचाच अर्थ सहाय्यक कोच, बॅटिंग, बॉलिंग कोचसह सर्व सदस्यांची निवड गंभीरच्या मनाप्रमाणे होईल. याबाबत समोर आलेल्या एका मोठ्या बातमीनुसार महान फिल्डर जॉन्टी ऱ्होडस टीम इंडियाचा फिल्डिंग कोच होऊ शकतो. सध्या राहुल द्रविडच्या कारकिर्दीमध्ये टी. दिलीप यांच्याकडं ही जबाबदारी आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जागतिक क्रिकेटच्या इतिहासात फिल्डिंगमध्ये जॉन्टी ऱ्होडसचं नाव आदरानं घेतलं जातं. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला फिल्डिंग सुपरस्टार होता. जॉन्टी ऱ्होड्सची मैदानातील चपळता पाहून नव्या पिढीला फिल्डिंगची प्रेरणा मिळाली. आज बहुतेक टीमचा फिल्डिंगचा स्तर उंचावल आहे. याचं श्रेय 1990 चं दशक फक्त फिल्डिंगच्या जोरावर गाजवणाऱ्या जॉन्टीचं आहे.
यापूर्वीही केला होता अर्ज
जॉन्टी ऱ्होडसं अद्याप फिल्डिंग कोचसाठी औपचारिक अर्ज केलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. त्यानंतरही या पदासाठी त्याचं नाव सर्वात आघाडीवर आहे. मु्ख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा उत्तराधिकारी निवडणं ही सध्या बीसीसीआयची प्राथमिकता आहे.
ट्रेंडींग बातमी - बांगलादेशच्या खेळाडूनं Live मॅचमध्ये केली चीटिंग, अंपायर पाहातच राहिले
जॉन्टी ऱ्होडसं यापूर्वी 2019 साली टीम इंडियाच्या फिल्डिंग कोचसाठी अर्ज केला होता. पण बीसीसीआयनं आर. श्रीधरची नियुक्ती केली होती. आर. श्रीधरनंतर सध्या टी दिलीपकडं हे पद आहे. आजवरच्या परंपरेनुसार मुख्य प्रशिक्षकच सपोर्ट स्टाफची निवड करतो. 2019 साली रवी शास्त्री यांनी आर. श्रीधर यांना फिल्डिंग तर भरत अरुण यांना बॉलिंग कोच म्हणून निवडलं होतं.