Bangladesh vs Nepal: T20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) नेपाळचा पराभव करत बांगलादेशनं सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. बांगलादेशनं या सामन्यात नेपाळचा 21 रननं पराभव केला. या मॅचमध्ये बांगलादेशनं पहिल्यांदा बॅटिंग करत 106 रन केले. तर, नेपाळला 19.2 ओव्हर्समध्ये 85 रनच करता आले. या विजयासह बांगलादेशचं सुपर 8 मधील स्थान निश्चित झालं. बांगलादेशनं सुपर 8 मध्ये प्रवेश केला असला तरी या मॅचमध्ये तंजीम हसन आणि Jaker Ali बॅटिंग करत असताना घडलेल्या एका घटनेचे सोशल मीडियावर पडसाद उमटले आहेत. (Controversial moments in T20 World Cup 2024 )
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय घडलं ?
बांगलादेशच्या इनिंगमधील 14 वी ओव्हर संदीप लमिछानेनं टाकली. तंजीम हसन या ओव्हरमधील शेवटचा बॉल खेळण्यास चुकला आणि बॉल त्याच्या पॅडला लागला. त्यावर बॉलरनं LBW चं अपिल केलं. अंपायरनं ते अपिल मान्य करत आऊट दिलं. त्यानंतर जे घडलं त्यानं फॅन्सना धक्का बसला.
अंपायरच्या निर्णयानंतर हसन पॅव्हिलियनमध्ये जाण्यासाठी चालू लागला. त्याचवेळी नॉन स्ट्रायकरला उभा असलेल्या बॅटरनं बांगलादेशच्या ड्रेसिंग रुमकडं DRS बाबत विचारणा केली. ड्रेसिंग रुमनं सिग्नल देताच बॅटरनं DRS घेण्याचा निर्णय घेतला. हा सर्व प्रकार मैदानात अंपायरच्या समोरच होत होता. पण, अंपायरनं कोणताही आक्षेप घेतला नाही. त्यानंतर टीव्ही रिप्लेमध्ये बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर जात असल्याचं स्पष्ट झालं.
ट्रेंडींग बातमी - T20 WC शेवटच्या बॉलवर जिंकता-जिंकता हरलं नेपाळ, लहान मुलासारखा रडू लागला खेळाडू
थर्ड अंपायरनं मैदानातील अंपायरला त्यांचा निर्णय बदलण्याची सूचना केली. त्यामुळे तंजीम आऊट होण्यापासून बचावला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. नॉन स्ट्रायकरचा बॅटर ड्रेसिंग रुमला DRS बाबत विचारणा करु शकतो का? हा प्रश्न फॅन्स विचारत आहेत. त्यांनी अंपायरवरही नाराजी व्यक्त केलीय.
Is this allowed @icc?
— 𝐊𝐨𝐡𝐥𝐢𝐧𝐚𝐭!𝟎𝐧_👑🚩 (@bholination) June 17, 2024
Non striker asked for assistance from the dressing room whether to take the DRS or not. 😭pic.twitter.com/7aJnl2YDMn
दरम्यान, बांगलादेशची टीम सुपर 8 मध्ये दाखल झालीय. सुपर 8 मध्ये त्यांची लढत भारत, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान विरुद्ध होईल. 19 जूनपासून सुपर 8 च्या लढती सुरु होत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world