आयपीएल 2026 मध्ये आपल्या बॅटने धुमाकूळ घालत तब्बल 776 धावा ठोकणारा आणि ऑरेंज कॅप जिंकणारा बिहारचा 15 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या जागतिक क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. भारतीय संघात पहिल्यांदाच स्थान मिळालेला वैभव 26 जूनपासून बेलफास्ट येथे सुरू होणाऱ्या आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. परंतु, या दौऱ्यादरम्यान ICC आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या (ECB) एका विशेष नियमामुळे वैभवला वरिष्ठ भारतीय खेळाडूंपेक्षा वेगळी वागणूक किंवा सुविधा दिली जाणार आहे.
'सेफगार्डिंग' नियमांमुळे मुख्य चेंजिंग रूम वापरण्यास बंदी
ब्रिटिश वृत्तपत्र 'द गार्डियन'ने दिलेल्या अहवालानुसार, इंग्लंडमधील हा दौरा आयसीसी मान्यताप्राप्त असल्याने तिथे 'बाल सुरक्षा आणि संरक्षण नियमावली' कडकपणे लागू असेल. आयसीसी आणि ईसीबीच्या नियमांनुसार, 16 वर्षांखालील कोणत्याही अल्पवयीन खेळाडूला प्रौढ खेळाडूंसोबत एकच चेंजिंग रूम किंवा कपडे बदलण्याची जागा वापरण्यास सक्त मनाई आहे.
(नक्की वाचा- Pune Lohagad Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, तिसऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतलं ताब्यात)
अशी असेल व्यवस्था
वैभव सूर्यवंशी सामन्यादरम्यान भारतीय ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित राहू शकतो, संघाच्या रणनीती आणि बैठकांमध्ये भाग घेऊ शकतो. मात्र, सामना सुरू होण्यापूर्वी आणि सामना संपल्यानंतर कपडे बदलण्यासाठी त्याला सर्व मैदानांवर स्वतंत्र चेंजिंग रूम दिली जाईल.
सचिन तेंडुलकरनंतर सर्वात तरुण खेळाडू
वैभव अजूनही शालेय विद्यार्थी असल्याने त्याला वरिष्ठ संघाच्या वातावरणात जुळवून घेता यावे, यासाठी बीसीसीआयने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण दौऱ्यात वैभवचे आई-वडील त्याच्यासोबत प्रवास करणार आहेत.
(नक्की वाचा- IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांना धक्का! यावेळी बदली नाहीतर जबाबदारीच काढून घेतली)
भारताचा हा दौरा मंगळवार, 26 जूनपासून आयर्लंडमधील बेलफास्ट येथे सुरू होत आहे. या दौऱ्यात भारत आयर्लंडविरुद्ध 2 आणि इंग्लंडविरुद्ध 5 असे एकूण 7 टी-20 सामने खेळणार आहे. जर वैभव सूर्यवंशीला या 7 सामन्यांपैकी एकाही सामन्यात अंतिम 11 खेळाडूंमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली, तर तो भारताच्या क्रिकेट इतिहासात वरिष्ठ संघात पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरेल.