होळी सण सगळीकडेच साजरा केला जात आहे. त्या क्रिकेटपटू जरी आपल्या खेळात व्यस्त असले तरी त्यातूनही त्यांनी वेळ काढत होळी साजरी केली. असाच एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. त्यात सचिन तेंडुलकर आपल्या काही सहकाऱ्यां बरोबर रंग खेळताना दिसत आहे. शिवाय काही जणांना घेवून त्याने अचानक युवराज सिंहला दिलेलं सरप्राईज तर भन्नाट म्हणावं लागेल. त्यामुळे युवराज ही होळी नक्कीच लक्षात ठेवेल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
इंडियन मास्टर्स संघाचा सध्या सचिन तेंडुलकर भाग आहे. या संघात युवराज सिंह सह अन्य खेळाडू ही आहेत. मास्टर्स टी20 लीग 2025 च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. या सामन्यात युवराज सिंह चमकला होता. त्यानंतर तो विश्रांती करत होता. पण सामन्यानंतर दुसऱ्या दिवशी होळी होती. त्यामुळे धमाल करण्याचा निर्णय सचिनने घेतला. त्याने काही सहकाऱ्यांना आपल्या बरोबर घेतले.
कुणाच्या बातात रंग तर कुणाच्या हातात रंगाचे फुगे होते. सचिनने रंगाने भरलेली पिचकारी स्वत:कडे घेतली होती. त्यानंतर या सर्वांनी आपला मोर्चा युवराज सिंहच्या रुमकडे वळवला. युवराज रुममध्ये झोपला होता. त्यावेळी एकाने त्याच्या दरवाज्यावर हाऊसकीपिंग असा आवाज दिला. त्यानंतर काही वेळात युवराजने दरवाजा उघडला. बाहेर काय होणार आहे याची त्याला कल्पना नव्हती. दरवाजा उघडल्यानंतर काही समजण्या आत सचिनने त्याच्यावर पिचकारीने रंग टाकले. काहींनी युवराजला बाहेर घेत त्याच्या त्याल रंगवून टाकले.
युवराजची झोप या रंगांनी क्षणात उडवली. सचिनने हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. अनेक लोकांनी हा व्हिडीओ पाहीला आहे. शिवाय लोकांनी तो पसंत ही केला आहे. युवराज सिंहला रंगवल्यानंतर सचिन आणि कंपनीने आपला मोर्चा अंबाती नायडूच्या दिशेने वळवला. अंबाती नायडू ही आपल्या रुममध्ये आराम करत होता. ज्या वेळी त्याने दरवाजा उघडला त्यावेळी सचिन आणि कंपनीनं त्याला ही रंगवून टाकलं.
सध्या मास्टर्स टी20 लीग 2025 सुरू आहे. या स्पर्धेच्या उपांत्या फेरीच्या सामन्यात युवराज सिंहने जबरदस्त फलंदाजी केली. त्याने ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर ब्राइस मैकगेन याच्या एकाच षटकात लागोपाठ तिन षटकार ठोकले. या मॅचमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 94 धावांनी पराभव केला. युवराजने या सामन्यात अर्धशतक केलं. या सामन्यानंतर वेळात वेळ काढून क्रिकेटपटूंनी होळी साजरी केली. त्यासाठी सचिन तेंडुलकरने पुढाकार घेतला.