Virat Kohli and Anushka Sharma Wimbledon 2025 : क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघे विम्बल्डन टेनिसस्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी इंग्लंडमधील सेंटर कोर्ट मैदानात उपस्थित होते. या स्पर्धेतील 8 व्या दिवशीचा सामना पाहण्यासाठी हे दोघे इथे आले होते. नोव्हाक जोकोविच आणि अलेक्स डी मिनॉर यांच्यात हा सामना रंगला होता. या दोघांव्यतिरिक्त इंग्लंडचा क्रिकेटपटू जो रूट, जेम्स अँडरसन, भारताचा क्रिकेटपटू रिषभ पंत आणि वेस्ट इंडीजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा हे देखील हा सामना पाहण्यासाठी आले होते. याशिवाय ऑलिव्हिया रॉड्रिगो, डेव्हिड बेकहॅम, प्रियांका चोप्रा आणि निक जोनास ही मंडळी देखील हा सामना पाहायला आली होती.
( नक्की वाचा: यूट्युबर रचना रानडेंनी खरेदी केली सव्वा कोटींची कार; इन्स्टाग्राम कॅप्शन चर्चेत )
Photo Credit- PTI
जोकोविच आणि अलेक्स यांच्यात रंगला सामना
विराट आणि अनुष्का हे दोघेजण टेनिसमधील दिग्गज खेळाडू नोव्हाक जोकोविच आणि वेगाने पुढे येत असलेला टेनिसपटू अलेक्स डी मिनॉर यांच्यातील सामना पाहण्यासाठी आले होते. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये, विराट आणि अनुष्का इतर प्रेक्षकांसोबत स्टँडमध्ये बसल्याचे पाहायला मिळाले होते. विराट कोहलीने तपकिरी रंगाचा ब्लेझर घातला होता, तर अनुष्का पांढऱ्या ब्लेझरमध्ये अतिशय आकर्षक आणि सुंदर दिसत होती.
( नक्की वाचा: 2.67 लाख पगार अन् खर्च फक्त 40 हजार; मुंबईकर तरुणीच्या खर्चाचा तपशील पाहून सगळेच चकीत! )
जोकोविच विजेतेपद पटकावेल?
नोव्हाक जोकोविच आणि अलेक्स डी मिनॉर यांच्यात झालेला सामना जोकोविचने 1-6, 6-4, 6-4, 6-4 असा जिंकला. ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची जोकोविचची ही 63 वी वेळ आहे. जोकोविचने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले तर तो रॉजर फेडररच्या 8 किताब जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी करू शकेल.
सेलिब्रिटींना तिकीटांसाठी किती खर्च करावा लागतो?
सेलिब्रिटींना, विशेषतः रॉयल बॉक्समध्ये आमंत्रित केलेल्या व्यक्तींना विम्बल्डनमध्ये प्रवेशासाठी कोणतेही शुल्क लागत नाही, अशी माहिती समोर आली आहे. ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लबचे (AELTC) अध्यक्ष व्हीआयपी (VIP) व्यक्तींना खास आमंत्रणे देतात. या आमंत्रणामुळे त्यांना विनामूल्य प्रवेश मिळतो, तसेच दुपारचे जेवण, अल्पोपाहार आणि सर्वोत्तम जागेवर बसण्याची सोय केली जाते. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे देखील अशाच आमंत्रित व्हीआयपी पाहुण्यांपैकी असण्याची शक्यता आहे.
( नक्की वाचा: बायको पुतण्यासोबत पळून गेली, नवऱ्याचं आयुष्य बरबाद झालं )
सामान्य लोकांसाठी विम्बल्डनची तिकिटे सार्वजनिक बॅलट्सद्वारे, तिकीट पुनर्विक्रीद्वारे किंवा रांगेत उभे राहून तिकीट काऊंटरवरून मिलू शकतात. सेलिब्रिटींना मात्र आमंत्रित केले असल्यास मोफत प्रवेश मिळतो, तर सामान्य प्रेक्षकांना तिकीट मिळवण्यासाठी वरील मार्गांचा अवलंब करावा लागतो.