RCB vs DC : रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरने दिल्ली कॅपिटल्सवर 6 विकेट्सने मात करत पराभवाचा वचपा काढला आहे. कृणाल पांड्या बंगलोरच्या विजराचा शिल्पकार ठरला आहे. कृणाल पांडाने 73 धावांची नाबाद खेळी करत बंगलोच विजय सोपा केला. तर विराट कोहलीनेही 51 धावांची निर्णायके खेळी केली. याआधी आरसीबी आणि दिल्लीमध्ये झालेल्या सामन्यात दिल्लीने बाजी मारली होती. त्यावेळी केएल राहुलने बंगळुरीतील स्टेडियमध्ये केलेलं सेलिब्रेशन व्हायरल झालं आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा
केएल राहुलने विजयानंतर "हे माझं मैदान आहे" असं दाखवत आरसीबीला डिवचलं होतं. त्याच सेलिब्रशनला विराटने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. दिल्लीविरुद्धच्या विजयानंतर विराटने आपल्या खास शैलीत सेलिब्रेशन करत राहुलसोबत मस्करी केली. सामना संपल्यानंतर केएल राहुल करुण नायरसोबत उभा होता. तिथे विराट पोहोचला आणि राहुलला इशारा करत त्याच्या सेलिब्रेशनची आठवण करुन दिली आणि हे माझं मैदान आहे, असंही सांगितलं.
केएल राहुलजवळ जात विराटने त्याची गळाभेट घेतली. त्यावेळी विराट जोरजोरात हसताना दिसत आहे. विराटचा हा मस्ती करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकजण हा व्हिडीओ शेअर करत आहेत.
मैदानात भिडले होते विराट-राहुल
विराट आणि केएल राहुलचा सामन्यादरम्यानचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होते आहे. ज्यात विराट आणि राहुलमध्ये शाब्दिक वाद घालताना दिसत आहेत. यावेळी कोहली पिच सोडून विकेटकिपींग करत असलेल्या राहुलच्या जवळ पोहोचला होता. स्टम्प माईकमध्ये दोखांचा आवाज येत होता. मात्र कोणत्या विषयावर त्यांचा संभाषण सुरु होतं हे समजलं नाही.