Virat Kohli : T20I क्रिकेटमधील निवृत्ती मागं घेण्यास विराट तयार, टीमसमोर ठेवली खास अट

विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधील निवृत्ती मागं घेण्याची तयारी दाखवलीय.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) स्पर्धा जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेटपटू आता आयपीएलच्या तयारीला (IPL 2025) लागले आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली त्याची आयपीएल टीम रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुमध्ये दाखल झाला आहे. विराट आयपीएलच्या पहिल्या सिझनपासून आरसीबीचा सदस्य आहे. पण, त्यानं आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मागच्या वर्षी वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या T20 वर्ल्ड कप स्पर्धेचं विजेतेपद जिंकल्यानंतर विराटनं या प्रकारातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

आरसीबी टीममध्ये दाखल झाल्यानंतर विराटनं त्याची निवृत्ती मागं घेण्याची तयारी दाखवली आहे. अमेरिकेतील लाँस एंजेल्समध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय टीम फायनलमध्ये पोहोचली तरच आपण एका मॅचसाठी निवृत्ती मागं घेण्यास तयार असल्याचं विराटनं मजेशीर सुरात सांगितलं. 2028 मध्ये हे ऑलिम्पिक होणार आहे. या ऑलिम्पिकमध्ये तब्बल 128 वर्षांनंतर क्रिकेटचं  पुनरागमन झालं आहे. 

'भारत 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये पोहोचला तर मी फक्त त्या मॅचसाठी निवृत्ती मागं घेण्याबाबत विचार करु शकतो. एक ऑलिम्पिक मेडल जिंकणे खूप संस्मरणीय असेल,' असं विराटनं सांगितलं. 

( नक्की वाचा :  IPL 2025 : आयपीएलपूर्वी मुंबई इंडियन्सला धक्का, बुमराहबाबत आली काळजीची बातमी )

निवृत्तीनंतर काय करणार?

क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर काय करणार? हा प्रश्न विराटला विचारण्यात आला होता. 'त्यावर मी अजून निवृत्तीनंतर काय करायचं यावर विचार केलेला नाही. मी नुकताच माझ्या टीममधील सहकाऱ्यालाही याबात प्रश्न विचारला होता. त्यावर त्यानं देखील तसंच उत्तर दिलं. निवृत्तीनंतर मला कदाचित भरपूर प्रवास करायला आवडेल, असं विराटनं सांगितलं.

ऑस्ट्रेलिया दौरा करणार नाही!

टेस्ट क्रिकेटबाबत देखील विराटनं मोठं वक्तव्य केलं आहे. 'मी कदाचित माझ्या कारकिर्दीमध्ये ऑस्ट्रेलिया दौरा करु शकणार नाही. आत्तापर्यंत जे काही झालं त्यावर मी समाधानी आहे,' असं विराट कोहलीनं सांगितलं. 

Advertisement

भारतीय टीमच्या मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहलीकडून मोठ्या अपेक्षा होत्या. त्यानं पर्थमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावत दमदार सुरुवात केली होती. पण, त्यानंतर विराटला फॅन्सच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत. पाच टेस्टच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सीरिजमध्ये त्यानं फक्त 190 रन्स केले होते. 
 

Topics mentioned in this article