जाहिरात

Who Is Saaniya Chandhok :सचिन तेंडुलकरची होणारी सून कोण आहे? किती कमावते? अर्जुनच्या भेटीची अनोखी कहाणी

क्रिकेटच्या जगातील देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकरचा सुपूत्र अर्जुन तेंडुलकर याची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू आहे.

Who Is Saaniya Chandhok :सचिन तेंडुलकरची होणारी सून कोण आहे? किती कमावते? अर्जुनच्या भेटीची अनोखी कहाणी

Who Is Saaniya Chandhok: क्रिकेटच्या जगातील देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकरचा सुपूत्र अर्जुन तेंडुलकर याची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू आहे.

अर्जुन तेंडुलकरही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत क्रिकेट क्षेत्रात आहे. मात्र सध्या तो साखरपुड्याच्या वृत्तामुळे चर्चेत आहे. अर्जुनने मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई याची नात सानिया चंडोकशी साखरपुडा केला आहे. ज्यानंतर सचिनचे चाहते गुगलवर त्याच्या सूनेसंदर्भात शोध घेत आहेत. सानिया कोण आहे आणि तिचं कुटुंब काय करतं याचा शोध घेतला जात आहे. 

सानिया चंडोक काय करते?

सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चंडोक प्राणीप्रेमी आहे आणि तिने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून बिझनेस मॅनेजमेंटची डिग्री घेतली आहे. सानिया चंडोकने शिक्षण घेतल्यानंतर पेट इंडस्ट्रीकडे वळली आणि स्वत:चं एक लग्जरी पेट स्पा सेंटर सुरू केलं. ज्यामध्ये प्रीमियम पेट सेवा दिली जाते. तिने मुंबईत Mr. Paws Pet  Spa & Store LLP नावाने पेट सलून आणि स्पा सुरू केलंय. सानिया याची डायरेक्टर आहे. या कंपनीची वार्षिक कमाई 90 लाखांच्या घरात आहे. 

या स्पा सेंटरमध्ये कुत्रा आणि मांजरींना खास ट्रीटमेंट दिली जाते आणि त्यांचं ग्रुमिंग होतं. कोरियन आणि जॅपनिज थेरेपीतून प्राण्यांना ट्रिटमेंट देणारं भारतातील हे पहिलं स्पा सेंटर आहे. सध्या मुंबईत Mr. Paws चे दोन स्टोअर आहे. सानिया स्वत: स्टोअरमध्ये प्राण्यांवर उपचार करताना दिसते. त्यांची काळजी घेणं तिला खूप आवडतं. सानियाने वर्ल्डवाइड व्हेटर्नरी सर्व्हिस (WVS) चा ABC प्रोग्राम पूर्ण केला आहे, त्यानंतर तिला तंत्रज्ञ म्हणून प्रमाणपत्र मिळाले आहे.

Saaniya Chandok Photos: अर्जुन तेंडुलकरच्या होणाऱ्या पत्नीचे 10 फोटो, नणंदबाईंसोबत आहे खास नातं...

नक्की वाचा - Saaniya Chandok Photos: अर्जुन तेंडुलकरच्या होणाऱ्या पत्नीचे 10 फोटो, नणंदबाईंसोबत आहे खास नातं...


फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे?

सानिया चंडोक मुंबईतील एका मोठ्या कुटुंबातील आहे. तिचे आजोबा रवी घई हे ग्रेविस ग्रुपचे मालक आहेत आणि ते अनेक व्यवसाय चालवतात. हाच ग्रुप ब्रुकलिन क्रीमरी आणि बास्किन-रॉबिन्स इंडिया हे आइस्क्रीम ब्रँड देखील चालवतो. याशिवाय तिच्या कुटुंबाकडे मुंबईतील इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल देखील आहे. तिचे कुटुंब अन्न आणि आतिथ्य क्षेत्रात काम करते आणि त्यांची उलाढाल  कोटींच्या घरात आहे. 

सानियाचे वडील गौरव घई यांचा त्याचे वडील रवी घई यांच्याशी फारशे चांगले संबंध नाहीत. दोघांमध्ये बऱ्याच काळापासून कौटुंबिक वाद सुरू आहे.

रवी घई यांच्या ग्रेविस ग्रुपने 2023-24 या आर्थिक वर्षात 624 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. हा मागील वर्षाच्या एकूण कमाईपेक्षा 20 टक्के जास्त होता. घई कुटुंब इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलमधूनही भरपूर कमाई करते.


सानिया आणि अर्जुनची भेट कशी झाली?

सानिया चंडोक आणि अर्जुन तेंडुलकर एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतात. दोन्ही कुटुंबाचे चांगले संबंध आहेत. सानिया चंडोक आणि अर्जुनची बहीण सारा तेंडुलकर खूप आधीपासून चांगल्या मैत्रिणी आहेत. याच मुळे सानिया आणि अर्जुन यांची भेट होत होती. सर्वात आधी सारानेच अर्जुन आणि सानियाची भेट घडवून आणली होती. 


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com