मानसी पिंगळे, प्रतिनिधी
India tour of Australia : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही 2024 मधील सर्वात महत्त्वाची टेस्ट सीरिज 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहेत. पर्थमध्ये सुरु होणाऱ्या या टेस्ट सीरिजची संपूर्ण क्रिकेट विश्वाला उत्सुकता आहे. या टेस्टपूर्वी टीम इंडियासाठी एक काळजीची बातमी आहे. भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) या सीरिजमधील पहिल्या दोन टेस्ट न खेळण्याची शक्यता आहे. रोहित वैयक्तिक कारणांमुळे या सीरिजच्या सुरुवातीच्या टप्प्यात खेळणार नसल्याची शक्यता आहे, अशी माहिती बीसीसीआयनं दिली आहे.
रोहित शर्मा हा अनुभवी कॅप्टन पहिल्या टप्प्यात उपलब्ध नसला तर तो टीम इंडियासाठी मोठा धक्का असेल. रोहितच्या अनुपस्थितीमध्ये टीम इंडियाची कॅप्टनसी कोण करु शकतो? याबाबतची चर्चा आता सुरु झाली आहे. बीसीसीआयसमोर त्यासाठी चार पर्याय आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जसप्रीत बुमराह
टीम इंडियाचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू. बुमराह पर्थ टेस्ट खेळणार हे नक्की आहे. हुशार बॉलर आणि परिस्थितीचं भान असलेला खेळाडू अशी बुमराहची ओळख आहे. रोहितच्या अनुपस्थितीमध्ये त्यानं यापूर्वीही इंग्लंडमध्ये टीम इंडियाच्या टेस्ट टीमचं नेतृत्त्व केलं आहे. रोहित पहिल्या दोन टेस्टसाठी उपलब्ध नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्क लोड मॅनेजमेंट हा देखील मुद्दा नसेल.
केएल राहुल
रोहितच्या अनुपस्थितीमध्ये केएल राहुलनंही टीम इंडियाचं टेस्टमध्ये नेतृत्त्व केलं आहे. मिडल ऑर्डरमधील बॅटर म्हणून राहुलचा अनुभव ऑस्ट्रेलियामध्ये महत्त्वाचा ठरेल. विकेट किपर किंवा स्लिपमधील फिल्डर म्हणून राहुल नेहमी मैदानात सक्रीय असतो. त्यानं यापूर्वीही टीम इंडियाची कॅप्टनसी केली असल्यानं त्याच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो.
PAK vs ENG 1st Test : पाकिस्तानचं घरच्या मैदानावर वस्त्रहरण, 556 रन करुनही एका इनिंगनं पराभव
ऋषभ पंत
ऑस्ट्रेलियातील 2021-22 मधील ऐतिहासिक सीरिज विजयात ऋषभ पंतचं मोलाचं योगदान होतं. डावखुऱ्या पंतची टेस्टमधील कामगिरी उजवी आहे. त्यामुळे त्याच्याकडं टेस्ट टीमचा भावी कॅप्टन म्हणून पाहिलं जात होतं. त्याला झालेल्या कार अपघातामुळे परिस्थिती बदलली. जिगरबाज पंतनं दमदार पुरागमन केलं आहे. बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये त्यानं सेंच्युरी झळकावली होती.
पंतकडं आत्मविश्वास आणि खेळातील स्मार्टनेस आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूमध्येही त्याचा दरारा आहे. त्यामुळे कॅप्टनपदासाठी पंतचा विचारही निवड समिती करु शकते.
शुबमन गिल
भारताच्या मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुबमन गिलंनं टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. गाबावर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा तो एक शिल्पकार होता. गिलची जुलै महिन्यात व्हाईट बॉल टीमचा व्हाईस कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वन-डे आणि T20 मध्ये गिलची जागा पक्की आहे. पण, टेस्टमध्ये त्याला अद्याप प्रभाव पाडता आलेला नाही. पण, निवड समितीनं व्हाईट बॉल क्रिकेटमधील धोरण रेड बॉलमध्ये वापरायचं ठरवलं तर शुबमन गिल रोहितच्या अनुपस्थितीमध्ये टीमचं नेतृत्त्व करु शकतो.