Champions Trophy 2025: 2 कारणांमुळे BCCI लांबणीवर टाकली टीमची घोषणा, प्रकरण 'गंभीर'

Champions Trophy 2025: पाकिस्तान आणि दुबईमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या टीम इंडियाची प्रतीक्षा करणाऱ्या क्रिकेट फॅन्सना शनिवारी (11 जानेवारी) धक्का बसला.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Champions Trophy 2025: पाकिस्तान आणि दुबईमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या टीम इंडियाची प्रतीक्षा करणाऱ्या क्रिकेट फॅन्सना शनिवारी (11 जानेवारी) धक्का बसला. या स्पर्धेसाठी टीम जाहीर करण्याची अंतिम तारीख 12 जानेवारी आहे. त्यामुळे भारतीय टीमची घोषणा शनिवारी किंवा रविवारी केली जाईल, अशी अपेक्षा होती. पण, हेड कोच गौतम गंभीर  (Gautam Gambhir)  आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित अगरकर (Ajit Agarkar) यांच्यातील दीर्घ चर्चेनंतर बीसीसीआयनं टीम जाहीर न करण्याचा निर्णय घेतला. आयसीसीकडून टीमच्या घोषणेसाठी मुदत वाढवून घेण्यात आली आहे. शेवटच्या क्षणी झालेल्या बदलाचे 2 प्रमुख कारणं आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पहिलं कारण

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. या पराभवानंतर दिग्गज क्रिकेटपटूंनी पुरेशी मॅच प्रॅक्टीस केली नव्हती. तसंच ते देशांतर्गत क्रिकेट खेळलं नव्हतं, अशी टीका करण्यात येत आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी सर्वांनी मॅच प्रॅक्टीस करावी, असं हेड कोच गंभीरचं मत आहे.

या स्पर्धेच्या नियमानुसार 13 फेब्रुवारीपर्यंत जाहीर झालेली टीम तात्पुरती मानली जाते. त्यामुळे या स्पर्धेपूर्वी होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या T20 आणि वन-डे सीरिजमध्ये भारतीय खेळाडूंनी खेळावं अशी गंभीरची इच्छा आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : Team India : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला बसणार धक्का? बड्या खेळाडूच्या पोस्टनं खळबळ )

दुसरं कारण

बीसीसीआयनं टीम जाहीर न करण्याचं एक कारण खेळाडूंचा फिटनेस हे देखील आहे. मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, संजू सॅमसन, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांच्या फिटेनेस आणि फॉर्मची नेमकी कल्पना आवश्यक असल्याचं बीसीसीआयचं मत आहे. त्यामुळे अंतिम निवडीपूर्वी या सर्वांना संधी देण्याचा निवड समितीचा विचार आहे.

वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांच्यात कोण अधिक उपयुक्त आहे? शमीचा फिटनेस कसा आहे? अर्शदीप पूर्ण लयमध्ये आहे का? या सर्व प्रश्नाची उत्तरं अद्याप अनुत्तरीत आहेत. त्यामुळे देखील बीसीसीआयनं टीमची निवड टाळली आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article