जाहिरात

Team India : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला बसणार धक्का? बड्या खेळाडूच्या पोस्टनं खळबळ

Champions Trophy 2025 : 19 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Team India : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला बसणार धक्का? बड्या खेळाडूच्या पोस्टनं खळबळ
मुंबई:

Ravindra Jadeja Instagram Post : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. 2017 नंतर पहिल्यांदाच ही स्पर्धा होणार आहे. पाकिस्तान आणि दुबईत होणाऱ्या या स्पर्धेसाठी निवड समितीनं टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. या टीममध्ये कुणाचा समावेश होणार? कुणाची संधी हुकणार? याची फॅन्समध्ये चर्चा सुरु आहे. त्याचवेळी टीम इंडियातल्या एका दिग्गज खेळाडूनं निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टनं ही चर्चा सुरु झाली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

महान ऑफ स्पिनर आर. अश्विननं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अचानक निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला होता. अश्विनचा खास सहकारी आणि टीम इंडियाचा ऑल राऊंडर रविंद्र जडेजानं निवृत्तीचे संकेत दिले आहेत. जडजेजानं इन्स्टाग्राम पोस्टवर त्याच्या टेस्टमधील जर्सीचा फोटो टाकला आहे. या पोस्टनंतर जडेजा लवकरच निवृत्त होणार अशी चर्चा सुरु आहे.

टीम इंडियानं गेल्या वर्षी T20 वर्ल्ड कप जिंकला. त्या चॅम्पियन टीमचा जडेजा सदस्य होता. भारताच्या विजेतेपदानंतर रोहित शर्मा, विराट कोहलीसह रविंद्र जडेजानंही आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 36 वर्षांचा जडेजा सध्या टेस्ट आणि वन-डे क्रिकेट खेळतोय. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया सीरिजमध्येही तो टीम इंडियाचा सदस्य होता.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निराशा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खराब कामगिरीमुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली सर्वांचं लक्ष्य होते. पण, या सीरिजमध्ये जडेजाची कामगिरीही साधारण होता. त्याला 3 टेस्टमध्ये फक्त 4 विकेट्स मिळाल्या. तसंच त्यानं बॅटनं 27 च्या सरासरीनं 135 रन्सचं योगदान दिलं होतं. 

( नक्की वाचा :  गौतम गंभीर खोटारडा, गंभीरच्या KKR मधील सहकाऱ्यानंच केला मोठा आरोप )

काही मीडिया रिपोर्टनुसार, जडेजाच्या खराब कामगिरीवर बीसीसीआयची निवड समिती चर्चा करण्याची शक्यता आहे. आगामी सीरिजसाठी जडेजा समावेश होणार नाही, असा दावाही काही रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 T20 आणि 3 वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेची सुरुवात 22 जानेवारीपासून होईल. त्यानंतर 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहभागी होईल. 

जडेजाची कामगिरी

जडेजाचासाठी ऑस्ट्रेलिया दौरा खराब गेला असला तरी तो टीम इंडियाचा महत्त्वाचा ऑल राऊंडर आहे. भारतीय पिचवर बॉलच्या मदतीनं तर भारताच्या बाहेर बॅटनं त्यानं उपयुक्त योगदान दिलं आहे. जडेजानं 80 टेस्ट, 197 वन-डे आणि 74 T20 इंटरनॅशनलमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे.

टेस्टमध्ये जडेजानं 3370 रन केले असून 323 विकेट्स घेतल्या आहेत. वन-डेमध्ये 2756 रन आणि 220 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. तर टी20 इंटरनॅशनलमध्ये 515 रन्स आणि 54 विकेट्स घेतल्या आहेत. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com