जाहिरात

Karun Nair: रणजी फायनलमध्ये करूण नायरची सेंच्युरी, हटके सेलिब्रेशनमधून निवड समितीला संदेश, Video

Karun Nair Scores Century In Ranji Trophy Final: करूण नायरनं  नागपूरच्या मैदानावर सेंच्युरी झळकावल्यानंतर जोरदार सेलिब्रेशन केलं. त्यानं दोन्ही हातांच्या बोटांनी 9 असा इशारा केला.

Karun Nair: रणजी फायनलमध्ये करूण नायरची सेंच्युरी, हटके सेलिब्रेशनमधून निवड समितीला संदेश, Video
मुंबई:

Karun Nair Scores Century In Ranji Trophy Final:  विदर्भ विरुद्ध केरळमध्ये सध्या रणजी ट्रॉफी 2025 ची फायनल सुरु आहे. या मॅचच्या चौथ्या दिवशी विदर्भाचा अनुभवी बॅटर करूण नायरनं दमदार सेंच्युरी झळकावली. नायरची पहिल्या इनिंगमधील सेंच्युरी 14 रन्सनं हुकली होती. त्यानं दुसऱ्या इनिंगमध्ये कोणतीही चूक न करता सेंच्युरी पूर्ण केली. या सेंच्युरीनंतर नायरनं केलेल्या हटके सेलिब्रेशनची सध्या जोरदार चर्चा आहे. या सेलिब्रेशनमधून त्यानं निवड समितीला खास मेसेज दिला आहे.

नायरनं फर्स्ट क्लास क्रिकेटमधील 23 वी सेंच्युरी 184 बॉल्समध्ये पूर्ण केली. त्यामध्ये 7 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं त्यानं ही सेंच्युरी केली. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विदर्भानं दुसऱ्या इनिंगमध्ये 4 आऊट 249 रन्स केले होते. नायर सध्या 132 रन्स काढून नॉट आऊट आहे. त्याच्या दमदार खेळीमुळे विदर्भाकडं सध्या 286 रन्सची आघाडी असून त्यांच्या 6 विकेट्स अद्याप बाकी आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सेलिब्रेशनचा अर्थ काय?

करूण नायरनं  नागपूरच्या मैदानावर सेंच्युरी झळकावल्यानंतर जोरदार सेलिब्रेशन केलं. त्यानं दोन्ही हातांच्या बोटांनी 9 असा इशारा केला. त्याचं हे सेलिब्रेशन सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नायर 2017 पासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. त्यापूर्वी त्यानं भारताकडून 6 टेस्ट आणि 2 वन-डे मॅच खेळल्या होत्या. तो टेस्ट क्रिकेटमध्ये ट्रिपल सेंच्युरी करणारा दुसरा भारतीय आहे.

( नक्की वाचा : Ranji Trophy Final : एकही IPL मॅच न खेळलेल्या बॉलरनं सर्व दिग्गजांना टाकलं मागं! विदर्भाला विजेतेपद मिळणार? )

नायरनं या सिझनमध्ये 9 सेंच्युरी झळकावल्या आहेत. त्यानं वन-डे फॉर्मेटमधील विजय हजारे स्पर्धेत पाच तर रणजी ट्रॉफीत चार सेंच्युरी झळकावल्या. त्यामुळे त्यानं 9 हा आकडा दाखवून सेलिब्रेशन केलं असं मानलं जात आहे.

नायरच्या सेंच्युरीची तसंच त्याच्या सेलिब्रेशनची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. त्याला टीम इंडियात घेण्याची मागणी क्रिकेट फॅन्स करत आहेत.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: