जाहिरात

Ranji Trophy : एकही IPL मॅच न खेळलेल्या बॉलरनं सर्व दिग्गजांना टाकलं मागं! विदर्भाला विजेतेपद मिळणार?

Ranji Trophy Final : विदर्भ आणि केरळ यांच्या  रणजी ट्रॉफी 2024-25 ची फायनल होत आहे. या मॅचच्या तिसऱ्या दिवशी आजवर एकही आयपीएल सामना न खेळलेल्या बॉलरनं इतिहास रचलाय.

Ranji Trophy : एकही IPL मॅच न खेळलेल्या बॉलरनं सर्व दिग्गजांना टाकलं मागं! विदर्भाला विजेतेपद मिळणार?
रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमध्ये विदर्भाला पहिल्या इनिंगमध्ये 37 रन्सची महत्त्वाची आघाडी मिळाली आहे. (फोटो - @BCCIdomestic)
मुंबई:

Ranji Trophy Final : विदर्भ आणि केरळ यांच्या  रणजी ट्रॉफी 2024-25 ची फायनल होत आहे. या मॅचच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला आहे. तिसऱ्या दिवसाच्या अखेर केरळची पहिली इनिंग 342 रन्सवर संपुष्टात आली आहे. विदर्भानं पहिल्या इनिंगमध्ये 379 रन्स केले होते. त्यामुळे विदर्भाला पहिल्या इनिंगमध्ये 37 रन्सची महत्त्वाची आघाडी मिळाली आहे. तिसऱ्या दिवशी आजवर एकही आयपीएल सामना न खेळलेल्या बॉलरनं इतिहास रचला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

22 वर्षांच्या बॉलरचा इतिहास

विदर्भाचा 22 वर्षांचा डावखुरा स्पिनर हर्ष दुबेनं (Harsh Dubey) पहिल्या इनिंगमध्ये फक्त 2 च्या इकोनॉमी रेटनं 88 रन्स देत 3 विकेट्स घेतल्या. हर्षनं तिसरी विकेट घेताच नवा इतिहास रचला. तो आता रणजी क्रिकेटच्या इतिहासात एकाच सिझनमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा बॉलर ठरला आहे.

( नक्की वाचा : Ranji Trophy : अजिंक्य, सूर्या आणि शिवमला एकाच ओव्हरमध्ये आऊट करणारा Parth Rekhade कोण आहे? )
 

हर्षनं बिहारच्या आशुतोष अमनचा रेकॉर्ड मोडला. आशुतोषनं 2018-19 च्या सिझनमध्ये 68 विकेट्स घेतल्या होत्या. अमननं या सर्व विकेट्स रणजी स्पर्धेतील प्लेट गटात घेतल्या होत्या. पण, हर्षनं एलिट ग्रुपमध्ये प्रमुख टीमविरुद्ध ही कामगिरी केली आहे. हर्षची ही कामगिरी विदर्भाच्या फायनलपर्यंतच्या प्रवासात महत्त्वाची ठरली. 

विदर्भानं पहिल्या इनिंगमध्ये 37 रन्सची आघाडी घेतली आहे. हा सामना अनिर्णित राहिला तर या आघाडीच्या जोरावरच विदर्भाला विजेतेपद मिळणार आहे. त्यामुळे फायनलमध्ये हर्षच्या 3 विकेट्स विदर्भासाठी महत्त्वपूर्ण ठरु शकतात. 

हर्षनं एकाच सिझनमध्ये 69 विकेट्स घेत आशुतोष अमनसह जयदेव उनाडकत, बिशन सिंह बेदी, डोडा गणेश आणि कंवलजीत सिंह यांना मागे टाकलं आहे. 

रणजी स्पर्धेच्या एका सिझनमध्ये जास्त विकेट्स घेणारे बॉलर्स 

69* - हर्ष दुबे : 2024/25
68 - आशुतोष अमन : 2018/19
67 - जयदेव उनादकट : 2019/20
64 - बिशन सिंह बेदी : 1974/75
62 - डोडा गणेश : 1998/99
62 - कंवलजीत सिंह : 1999/00

हर्षनं मागील सिझनमध्येही विदर्भाकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतरही सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या दुलिप ट्रॉफीसाठी त्याच्याकडं दुर्लक्ष करण्यात आलं होतं. त्याचबरोबर आयपीएल ऑक्शनमध्येही तो दुर्लक्षित राहिला. त्यानंतरही हर्षनं या रणजी सिझनमध्ये सर्वांना मागं टाकतं क्रिकेट विश्व त्याच्याकडं दुर्लक्ष करणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: