
India 'A' squad Announced vs England: आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारत 'अ' संघाची (India A Team Announced vs ENG Test Series) घोषणा निवड समितीनं केली आहे. ही टीम कँटरबरी आणि नॉर्थम्प्टन येथे इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन फर्स्ट क्लास मॅच खेळणार आहे. या दौऱ्याचा समारोप टीम इंडिया (वरिष्ठ) विरुद्धच्या सामन्याने होईल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या टीममध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यानं रन्स करणाऱ्या करुण नायरचा समावेश करण्यात आला आहे. त्याचे राष्ट्रीय टीममध्ये पुनरागमन झालंय. नायरनं 2016 मध्ये चेन्नई येथे इंग्लंडविरुद्ध झालेल्या टेस्टमध्ये ट्रिपल सेंच्युरी झळकावली होती. यंदा विदर्भाला रणजी स्पर्धेचं विजेतेपद मिळवून देण्यातही त्याचं मोठं योगदान होतं. त्यानं 2024/25 सिझनमध्ये 53.93 च्या सरासरीने 863 रन्स केले होते. तो गेल्या दोन सिझनमध्ये इंग्लंडमधील नॉर्थम्प्टनशायरसाठी विभाग 1 काउंटी चॅम्पियनशिपमध्येही खेळला आहे. नायरनं 14 इनिंगमध्ये 56.61 च्या सरासरीने 736 रन्स केले. त्यामध्ये दोन सेंच्युरीचा समावेश आहे. 202 हा त्याचा सर्वोच्च स्कोअर आहे.
( नक्की वाचा : 'आम्ही त्याची वाट पाहतोय...', मुख्यमंत्र्यांनी वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्माकडं केली खास मागणी )
या टीममध्ये टीम इंडियाच्या सिनियर टीममधील ओपनर यशस्वी जैस्वालचाही समावेश करण्यात आलाय. तर अभिमन्यू इश्वरन या टीमचा कॅप्टन आहे. शुभमन गिल आणि बी. साई सुदर्शन 3 जून रोजी आयपीएल 2025 संपल्यानंतर इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी भारत 'अ' संघात सामील होतील, अशी घोषणा निवड समितीनं केली आहे.
भारत 'अ' संघ इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन सामने (30 मे ते 2 जून दरम्यान कँटरबरी येथे आणि 6 ते 9 जून दरम्यान नॉर्थम्प्टन येथे) आणि वरिष्ठ भारतीय टेस्ट टीम विरुद्ध एक इंट्रा-स्क्वाड सामना (13 ते 16 जून दरम्यान बेकेनहॅम येथे) खेळणार आहे.
भारत 'अ' टीम: अभिमन्यू ईश्वरन (कॅप्टन), यशस्वी जैस्वाल, करुण नायर, ध्रुव जुरेल (व्हाईस कॅप्टन) (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, शार्दुल ठाकूर, इशान किशन (विकेटकिपर), मानव सुतार, तनुष कोटियन, मुकेश कुमार, आकाश दीप, हर्षित राणा, अंशुल कंबोज, खलील अहमद, ऋतुराज गायकवाड, सरफराज खान, तुषार देशपांडे आणि हर्ष दुबे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world